नाशिक – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांची अवैध व्यवसायाविरोधात जिल्ह्यात व्यापक स्वरूपात मोहीम सुरू आहे. याअंतर्गत दोन दिवसात नाशिक ग्रामीण आणि मालेगाव परिसरात केलेल्या कारवाईत अवैध दारू, हत्यार, अमली पदार्थ, गुन्ह्यात वापरलेली वाहने असा ५७ लाख, सहा हजार, ३६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाशिक ग्रामीण पोलीसांच्या वतीने सुरू असलेल्या मोहिमेत जिल्ह्यात ५७ संशयितांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत १४९.६७ लिटर देशी, विदेशी दारू तसेच हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, तयार गावठी दारू व इतर साहित्य असा पाच लाख, १४ हजार १६५ रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. घातक शस्त्र बाळगणाऱ्यांविरूध्द पाच गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये देशी बंदूक, चार तलवार, कोयता असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. मालेगाव शहरातील पवारवाडी पोलीस ठाण्यात संशयिताच्या ताब्यातून १८ हजार रुपयांच्या अल्प्राझोलम गोळ्या जप्त करण्यात आल्या.