लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत १५ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने १५ ते २० ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करून ५७१ प्रकरणांवर वैध निर्णय घेतले आहेत.

Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
suspension of recruitment in Chandrapur district bank due to Congress raise issue of recruitment in campaign
नोकरभरतीचा मुद्दा प्रचारात आणणारा काँग्रेस पक्ष तोंडघशी, चंद्रपूर जिल्हा बँकेतील नोकरभरतीला स्थगिती
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?

आणखी वाचा-“संजय राऊत यांनी स्वत:चीही चौकशी करण्यास सांगावे”, दादा भुसे यांचे आव्हान

याबाबतची माहिती उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य यांनी कळविली आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रकरणे त्रुटी पूर्ततेअभावी अर्जदारांकडे प्रलंबित आहेत. अशा अर्जदारांना जिल्हा जात पडताळणी समितीने अर्जदारांच्या ई मेलवर त्रुटी कळविल्या आहेत. त्यांची पूर्तता अद्याप ज्या अर्जदारांनी केलेली नसल्याने त्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत, अशा अर्जदारांनी त्रुटीसह व मूळ कागदपत्रांसह कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी चार या वेळेत जिल्हा जात पडताळणी समितीच्या नागरी सुविधा केंद्र, नाशिक येथे उपस्थित रहावे. ज्या अर्जदारांकडून नमूद कालावधीत त्रुटींची पूर्तता न झाल्यास त्यांच्या प्रकरणांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने म्हटले आहे. कोणत्याही अर्जदाराने त्रयस्थ व्यक्तीकडे संपर्क करू नये व त्रयस्थ व्यक्तिच्या आमिषास बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.