सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव बाऱ्हे येथे ६० हून अधिक जणांना महाप्रसादातून विषबाधा झाल्याचे समोर आले. या रुग्णांवर बाऱ्हे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठाणगाव येथे हनुमान जयंती निमित्ताने ग्रामस्थांनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. दुपारी सहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. जेवण केल्यानंतर संध्याकाळी काहींना जुलाब, उलटी, मळमळणे हा त्रास जाणवू लागला. एकामागून एक असे ६० पेक्षा जास्त जणांना हाच त्रास झाला.
हेही वाचा >>> नाशिक : चांदवड देवळा बस झाडाला धडकून अपघात, दोघांचा मृत्यू
या प्रकाराने गावात अस्वस्थता पसरली. संबंधितांना तात्काळ बाऱ्हे ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. महाप्रसादातून विषबाधा झाल्याचे सांगितले जाते. वैद्यकीय अधिकारी डॉ. देवानंद चौधरी, डॉ. राहुल रजपूत हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. महाप्रसादाचा नमुना तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. शुक्रवारी गुड फ्रायडेनिमित्त सुट्टी असल्याने सर्वच आरोग्य कर्मचारी रुग्णालयात उपस्थित नव्हते. अचानक रुग्ण संखेत वाढ झाल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आमदार नितीन पवार यांनी या घटनेची दखल घेत तालुक्यातील सर्वच रुग्णवाहिका बाऱ्हे येथे पाठविल्या. ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा लक्षात घेऊन परिसरातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले.
हेही वाचा >>> जळगाव : तलाठ्यासह कोतवाल लाच घेताना जाळ्यात
शुक्रवारी गुड फ्रायडेनिमित्त सुट्टी असल्याने सर्वच आरोग्य कर्मचारी रुग्णालयात उपस्थित नव्हते. अचानक रुग्ण संखेत वाढ झाल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आमदार नितीन पवार यांनी या घटनेची दखल घेत तालुक्यातील सर्वच रुग्णवाहिका बाऱ्हे येथे पाठविल्या. ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा लक्षात घेऊन परिसरातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले.