नाशिक : संक्रातीसाठी महिन्याहून अधिक कालावधी असताना आतापासूनच पतंगी उडविण्यास जिल्ह्यात सुरुवात झाली असून रविवारी सिन्नर परिसरात पतंगीच्या नायलॉन मांजामुळे ६३ वर्षाच्या वृध्दाचा गळा कापला गेला. त्यांच्यावर वेळेत उपचार झाल्याने प्रकृती स्थिर आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा…परीक्षा केंद्रातच महिलेस प्रसुती वेदना अन पोलिसांची तत्परता
रविवारी दुपारी अरूण चांडोले (रा. नायगाव रस्ता, सिन्नर) हे दुचाकीने सिन्नर औद्योगिक वसाहत परिसरातून सिन्नरकडे येत असताना त्यांचा गळा नायलॉन मांजाने कापला गेला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना ३२ टाके पडले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. नायलाॅन मांजावर बंदी असतानाही त्याचा वापर होत असल्याचे यानिमित्ताने दिसून आले.
First published on: 01-12-2024 at 20:10 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 63 year old man throat was cut by nylon manjha but his condition stabilised sud 02