नंदुरबार – महाशिवरात्रीनिमित्त नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथील नागरिकांनी भगर खाल्ल्याने विषबाधा झाली. शुक्रवारी रात्री नऊपर्यंत ७५ जणांना विषबाधा झाली असून यातील ४० जणांना रनाळे येथील ग्रामीण रुग्णालयात तर पाच ते सहा जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतरांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. जिल्हा रुग्णालयाचे पथक घोटाणे  आणि रनाळे येथे तळ ठोकून आहेत.

हेही वाचा >>> नाशिक : चोरीच्या वाहनासह पळवलेल्या मुलीचा शोध, दहा वर्षांनंतर मुलगी पालकांच्या स्वाधीन

Villagers of Kundevhal Bambawipada suffer from respiratory problems due to dust from mines
कुंडेवहाळ, बंबावीपाडा ग्रामस्थांचे आयुष्य ‘माती’मोल; खदाणींच्या धुळीमुळे श्वसनाचे विकार, प्रशासनाचे दुर्लक्ष
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
One person died, eight injured , vehicle fell in valley,
ठाणे : वाहन दरीत कोसळून एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी
one transgender brutally murdered in Malkapur city
तृतीयपंथीयाची निर्घृण हत्या; मलकापूर शहर हादरले
pistol 28 cartridges seized from passenger at pune airport
पुणे विमानतळावर प्रवाशाकडून २८ काडतुसे जप्त
Three soldiers killed in Bandipora
बांदीपोरामध्ये तीन जवानांचा मृत्यू; लष्कराच्या वाहनाला अपघात; दोन जखमी
mobile toilets burnt loksatta news
मुंबई : ॲण्टॉप हिल येथे दहा शौचालये जाळली, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
408 people committed suicide in Dhule district during 2024
धुळे जिल्ह्यात वर्षभरात ४०८ जणांची आत्महत्या; पुरुषांची संख्या सर्वाधिक

महाशिवरात्री असल्याने सर्वत्र फराळ, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथे रहिवाशांनी एका विशिष्ट कंपनीची भगर फराळासाठी खरेदी केली होती. दुपारी १२ ते एक या वेळेत भगर खाल्ल्यानंतर सायंकाळी अनेकांना त्रास जाणवू लागला. अनेकांना मळमळ, उलट्या, संडासचा त्रास सुरु झाला. यामुळे तत्काळ रनाळे येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांनी धाव घेतली. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक नरेश पाडवी यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. रात्री नऊपर्यंत  ७५ जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले होते. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. नरेश पाडवी यांनी दिली.

हेही वाचा >>> जळगाव जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेतून किती जणांना मिळणार रोजगार? जाणून घ्या

महाशिवरात्रीपूर्वी दवंडीतून सूचना गेल्या महिन्यात एका कार्यक्रमात भगरमधून भाविकांना विषबाधा झाल्याने आरोग्य प्रशासन यावेळी सतर्क झाले होते. यामुळे गावांमधून यापूर्वीच ‘भगरपासून सावधान’ असे सांगत दवंडी देवून सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले होते.

Story img Loader