नाशिक : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत येथे होणाऱ्या कार्यक्रमात ५० हजार लाडक्या बहिणींना सहभागी करण्यासाठी तब्बल ९०० बसेसचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे नाशिकसह धुळे, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांतून बसेस मागविल्या जाणार आहेत. त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील प्रवासी, पासधारक विद्यार्थ्यांची दैनंदिन वाहतूक कोलमडण्याची शक्यता आहे.

पंचवटीतील तपोवन मैदानात लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होत आहे. भव्य जलरोधक तंबू उभारण्यात येत आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून ५० हजार लाडक्या बहिणींना निमंत्रित करण्यात आले आहे. तालुकानिहाय बहिणींच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहनच्या ७०० आणि शहरातील बहिणींसाठी नाशिक परिवहन महामंडळाच्या (सिटीलिंक) २०० अशा एकूण ९०० बस सज्ज ठेवल्या जातील.

ticket inspector caught ticketless passengers, ticketless passengers,
महिला तिकीट तपासनीसाने एकाच दिवसात पकडले १०३ विनातिकीट प्रवासी, वाचा कसे आणि किती दंड वसूल केला
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Nashik State Transport Department will run extra bus during diwali
दिवाळीसाठी नाशिक विभागाकडून जादा बससेवा
 ‘मायक्रोफायनान्स’ संस्थांना अवाजवी कर्ज देण्यापासून परावृत्त करणे आवश्यक
woman dies after falling from local train Incident between ambernath badlapur station
लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू ; अंबरनाथ बदलापूर स्थानकादरम्यानची घटना
Sudhir Gadgil Sangli, BJP nominated Sudhir Gadgil,
निवडणूक लढणार नाही अशी घोषणा करणाऱ्या गाडगीळ यांनाच भाजपची पुन्हा संधी
Seven hundred women cheated, Mudra loan, case against a woman,
मुद्रा लोनच्या नावाखाली सातशे महिलांना २५ लाखांस गंडविले, सोलापुरात भामट्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
Maharashtra BJP candidate list 2024 for Legislative Assembly Election 2024 in Marathi
Maharashtra BJP Candidate List 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी समोर; ९९ जागांसाठी जाहीर केले उमेदवार, कुणाला संधी?

आणखी वाचा-मविआ सत्तेत आल्यावर लुटारु मंत्री, अधिकाऱ्यांना कारागृहात टाकणार; आदित्य ठाकरे यांचा इशारा

राज्य परिवहन नाशिकमधून २५० आणि शेजारील अहमदनगर, धुळे, जळगाव जिल्ह्यातून उर्वरित ४५० बसेस मागविण्यात येत आहेत. नाशिक मनपा परिवहन महामंडळ अर्थात सिटीलिंक आपल्या ताफ्यातील ८० टक्के बस उपलब्ध करत आहेत. यामुळे शुक्रवारी नाशिक शहरासह ग्रामीण भागातील बससेवा विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे. कमी-अधिक प्रमाणात धुळे, जळगाव अहमदनगरमध्येही बसेसची कमतरता जाणवणार आहे. लाडक्या बहीण कार्यक्रमाची झळ जिल्हांतर्गत आणि लांब पल्ल्याच्या बससेवेला बसणार असल्याचे चित्र आहे.

सिटीलिंकचे एक लाख प्रवासी

मनपा सिटीलिंक बस सेवेतून दररोज एक लाख जण प्रवास करतात. यामध्ये २६ हजार पासधारक विद्यार्थी आहेत. २५० पैकी २०० बसेस लाडक्या बहीण कार्यक्रमासाठी वापरल्या जातील. कार्यक्रम संपल्यानंतर बहिणींना पुन्हा घरी सोडले जाणार असल्याने त्या बस लगेचच प्रवासी सेवेत वापरता येणार नाहीत, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केले. यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.

आणखी वाचा-नाशिक : पंचवटीत युवकाची हत्या, महिलेकडून दोन लाखाची सुपारी, चार जण ताब्यात

काही मार्गांवर फेऱ्या कमी करणार

नाशिक, धुळे, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यातून ७०० बसेस कार्यक्रमासाठी उपलब्ध करताना प्रवाशांना त्रास होणार नाही, अशा प्रकारे नियोजन केले जात आहे. प्रत्येक आगारात काही बस अतिरिक्त असतात. काही मार्गावर फेऱ्या कमी करून कार्यक्रमासाठी बस उपलब्ध केल्या जातील. -अरूण सिया (विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ)