लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: शेतात काम करीत असलेल्या ६० वर्षाच्या वृध्देचा साप चावल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथे राहणाऱ्या लताबाई बोरसे या शेतात काम करीत असतांना त्यांच्या पायाला साप चावला. हा प्रकार लक्षात येताच त्यांना औषधोपचारासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.