नाशिक – प्रवासात गुंगीकारक औषध देवून लुटमार करणारी महिला आणि तिच्या चार साथीदारांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. संशयितांच्या चौकशीत चार गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा विभाग एकला यश आले आहे. टोळीकडून १४ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सिडकोतील बापू सूर्यवंशी यांचा वाहन चालविण्याचा व्यवसाय आहे. सूर्यवंशी यांच्याशी पंचवटी येथील काजल उगरेज हिने दूरध्वनीवरून संपर्क साधत सूरत येथे जायचे असल्याचे सांगितले. १२ मे रोजी ठरल्यानुसार उगरेज यांना पंचवटी परिसरातून पुढील प्रवासासाठी सूर्यवंशी यांनी वाहनात बसविले. दिंडोरी रोड परिसरात उगरेज यांचे काही मित्र वाहनात बसले. त्यांनी देवीचा प्रसाद म्हणून गुंगीचे औषध टाकलेला पेढा वाहनचालक सूर्यवंशी यांना खाण्यासाठी दिला. पेढा खाल्ल्यानंतर सूर्यवंशी यांची शुध्द हरपताच त्यांची स्विफ्ट कार, अंगावरील सोन्याचे दागिने, पाकीट असा एक लाख, ९१ रुपये किंमतीचा माल लंपास केला. या प्रकरणी सूर्यवंशी यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

In four cases of burglary in different parts of Nashik city more than 30 lakhs lost
नाशिक शहरात घरफोडीचे सत्र, ३० लाखहून अधिकचा ऐवज लंपास
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
nashik case filed against three individuals for causing accident by transporting iron bars
नाशिक अपघातास कारणीभूत तिघांविरुध्द गुन्हा, सळई पुरवठादाराचाही समावेश
Gang involved in gold chain and vehicle theft arrested
सोनसाखळी, वाहनचोरी करणारी टोळी उघडकीस; सराईत अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
nashik md drugs loksatta
नाशिक : अमली पदार्थ विक्री प्रकरणी तीन महिलांसह चौघे ताब्यात
nashik land purchase fraud
नाशिक : हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या नावाने फसवणूक, दोन जणांविरुद्ध गुन्हा
drugs parli connection loksatta news
“गुजरातमध्ये सापडलेल्या ड्रग्जचे परळी कनेक्शन”, आमदार सुरेश धस यांचा धाराशिवमध्ये गौप्यस्फोट
Drugs worth Rs 44 lakh seized in Katraj area one arrested by anti-narcotics squad
कात्रज भागात ४४ लाखांचे अमली पदार्थ जप्त, अमली पदार्थ विरोधी पथकाकडून एकाला अटक

हेही वाचा >>>मुंबईत जूनमध्ये राष्ट्रीय आमदार संमेलनाचे आयोजन

म्हसरूळ पोलीस आणि गुन्हे शाखा विभाग एकच्या वतीने या घटनेचा तपास करण्यात आला. तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे म्हसरूळ परिसरातील गुन्हेगार नीलेश राजगिरे याचा सहभाग असल्याचे लक्षात आले. राजगिरे यास २२ मे रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले. या गुन्ह्यात सहभाग असणारी काजल आणि मुख्य संशयित दिनेश कबाडे, किरण वाघचौरे, मनोज पाटील यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली. कबाडे याला नाशिकरोड परिसरातून वाहनासह ताब्यात घेण्यात आले. संशयित महिला आणि अन्य संशयितांनाही ताब्यात घेतले. संशयितांकडे गुंगीकारक औषधे मिळाली. २१ मे रोजी त्यांनी अशाच पध्दतीने एक कार पळविल्याची कबुली दिली. संशयितांना २६ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

हेही वाचा >>>इचलकरंजीची नवी ओळख ‘एमएच ५१’; इचलकरंजी नाशिक ग्रामीण की संगमनेर यावरून समाज माध्यमात वाद

म्हसरूळ हद्दीतील गुन्ह्यातील वाहन, २९ ग्रॅम सोने असा १४ लाख ८६,५०० रुपयांचा मुद्देमालही त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला.. म्हसरूळ, आडगाव, पालघर येथील कासा, औरंगाबाद येथील वाळुंज पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले, मुख्य आरोपी दिनेश कबाडे व किरण वाघचौरे याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. संशयित काजल उगरेज हिचा पती कारागृहात आहे.

Story img Loader