नाशिक – मालेगाव शहरातील सराफी दुकानात सोने चोरणारी महिलांची टोळी ताब्यात घेऊन किल्ला पोलिसांनी १२ तासांत गुन्ह्याची उकल केली.

मालेगाव येथे २३ मे रोजी सायंकाळी सराफ व्यावसायिक नटवरलाल वर्मा यांच्या मे. वर्मा गोल्ड सराफ दुकानात तीन बुरखाधारी महिलांनी प्रवेश केला. सोन्याचे दागिने दाखविण्याच्या बहाण्याने १५२ ग्रॅम वजनाच्या दागिन्यांचा खोका हातचलाखीने लंपास केला. या प्रकरणी किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा – नाशिक: आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी २२७० कोटींचा पुरवणी निधी मंजूर

सहायक निरीक्षक गौतम तायडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासले. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी साजेदाबानो उर्फ अन्नु बशीर खान (रा. कुसूंबारोड), ताहेरा उर्फ आशिया खुर्शीद अहमद (रा. ताजपंचन चौक), नाजीया शेख इस्माईल शेख (रा. कौसिया कॉलनी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून सुमारे तीन लाख, पाच हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

Story img Loader