नाशिक: स्थानिक द्राक्ष उत्पादकाची परप्रांतीय व्यापाऱ्याने तीन लाखांहून अधिक रकमेला फसवणूक केली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिजाबाई कातकाडे (६८, रा. दिंडोरी) यांची द्राक्ष शेती आहे. संशयित हरिसिंग सिकरवार (रा. मध्य प्रदेश) याने मार्चमध्ये कातकाडे यांच्या बागेतील सुधाकर थॉमसन कंपनीची निर्यातक्षम द्राक्षे २६ रुपये किलो दराने याप्रमाणे ३०० क्विंटल खरेदी केले. पाच लाख ५१ हजार रुपयांत हा व्यवहार ठरला. यातील दोन लाख २५ हजार रुपये धनादेश आणि फोन पेच्या माध्यमातून हरिसिंगने दिले.

हेही वाचा… नाशिक पोलिसांची ३१ डिसेंबरसाठी सज्जता; वाहन तपासणीसह हाॅटेल, ढाब्यांवर नजर

उर्वरीत तीन लाख ३६ हजार रुपये मिळण्यासाठी कातकाडे यांनी हरिसिंगशी वारंवार संपर्क साधला. पैशांची मागणी केली. हरिसिंग पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याचे लक्षात आल्यावर कातकाडे यांनी वणी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्यावर हरिसिंगविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Story img Loader