लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: महागडी मोटार बक्षीस लागल्याच्या भूलथापा देत एकाने शहरातील वृध्दास अडीच लाखांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. याबाबत अभिमन्यू माळी (६२, मेट्रो झोन समोर, पाथर्डीरोड, इंदिरानगर) यांनी तक्रार दिली.
माळी यांच्याशी मे महिन्यात संशयितांनी संपर्क साधला होता. नेक्सा कंपनीची मोटार बक्षीस लागल्याचे सांगून अभिनंदन केले होते. नंतर माळी यांचा विश्वास संपादन करीत संशयितांनी विम्यासह विविध कारणांची बतावणी करीत ७९८०९७८७२६, ८२७२९८८०६८, ९०३८२६१९८७, ८२०८९५६७९१ आणि ९८०९७८७२६ आदी भ्रमणध्वनी क्रमांकावर फोन पेच्या माध्यमातून त्यांना तब्बल अडीच लाख रुपये भरण्यास भाग पाडले. तीन महिन्यानंतरही मोटार आणि पैसे न मिळाल्याने माळी यांनी संशयितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो झालाच नाही.
हेही वाचा… वाहतूक नियोजनाअभावी बालकाचा मृत्यू; मालेगावात विविध संघटनांचे आंदोलन
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.