नाशिक: शहरात पोलिसांचा कोणताही धाक उरला नसल्यासारखी स्थिती असून पुन्हा एकदा भरदिवसा टोळक्याने युवकाची हत्या करुन पोलिसांना आव्हान दिले आहे. सिडकोतील शिवाजी चौक व्यापारी संकुल परिसरात ही हत्या करण्यात आली.

रात्री नाकेबंदी, ठिकठिकाणी तपासणी मोहीम, एखाद्या गुन्ह्यातील संशयित सापडल्यास त्याला त्या परिसरातून फिरविणे, असे वेगवेगळे उपाय करुन कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून काही दिवसांपासून केला जात आहे. परंतु पोलिसांकडून कठोर भूमिका घेतली जात नसल्याचा फायदा गुन्हेगारांकडून घेतला जात आहे. त्यामुळेच पंधरवड्यात दुसऱ्यांदा दिवसाढवळ्या हत्येचा प्रकार घडला.

phulambri Fire shop, phulambri, Fire in a shop,
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीतील दुकानात आगीनंतर भडका; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना

हेही वाचा… गोदा प्रदुषणामुळे मनपा प्रशासनावर कारवाई करावी, विभागीय आयुक्तांचे आदेश

सिडकोतील शिवाजी चौक व्यापारी संकुल परिसरात संदीप आठवले (२२) हा भाजी विकण्याचे काम करतो. गुरूवारी सायंकाळी तो शिवाजी चौकात आला असता दुचाकीवरुन आलेल्या सहा जणांनी त्याच्यावर काही समजण्याच्या आत कोयत्याने वार केले. पंचवीसपेक्षा अधिक वार झाल्याने संदीप रक्ताच्या थारोळ्यात पडला. हल्ल्यानंतर संशयित निघून गेले. संदीपला तातडीने जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. परंतु, डॉक्टांनी तपासून मृत घोषित केले. यावेळी रुग्णालय परिसरात मृताचे नातेवाईक आणि मित्रांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गर्दी पांगवली. अंबड पोलीस ठाण्यात सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा… चाचणीच्या नावाखाली इलेक्ट्रिक वाहनाची चोरी

अंबड पोलीस ठाणे हद्दीतील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता सिडको आणि अंबडसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी अजूनही प्रलंबितच आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे अंबड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सोपस्कार तेवढे पार पाडले जातात. तत्कालीन निरीक्षक श्रीकांत परोपकारी यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी आलेले कुमार चौधरी, सूरज बिजली यांची बदली झाली. बिजली यांच्यानंतर देशमुख आले. त्यानंतर सध्या अंबड पोलीस ठाण्याची जबाबदारी प्रमोद वाघ यांच्यावर आहे.

महिन्यातील चौथा खून

सिडको, अंबड परिसरात हत्या सत्र सुरुच असून महिन्याभरात चार खून झाले आहेत. अंबड परिसरात किरकोळ कारणातून मिराज खान आणि इब्राहिम शेख यांची हत्या झाली होती. त्यानंतर दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने अंबडमधील युवकाची हत्या झाली. त्यानंतर संदीप आठवलेची हत्या झाली.