धुळे: शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान शिवारात तूर आणि कापूस पिकाच्या मधोमध तीन कोटी रुपयांच्या गांजाची लागवड केल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला. या कारवाईत सहा हजार दोन किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली. शिरपूर तालुक्यातील एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाकड्या हनुमान शिवारातील देवा पावरा याने त्याच्या शेतात तूर आणि कापूस पिकाच्या मधोमध गांजाची लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंद यांना मिळाली. त्यानुसार अधीक्षक संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दत्तात्रय शिंदे, शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक जयेश खलाणे, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, पोलीस नाईक पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, मयुर पाटील, योगेश जगताप, किशोर पाटील, जगदीश सूर्यवंशी, देवेंद्र ठाकूर यांच्या पथकाने देवा पावरा हा कसत असलेल्या शेताचा शोध घेतला.

drug, Nagpur , drug addiction, narcotics ,
नागपूर शहर बनले नशाखोरीचे केंद्र, वर्षभरात ३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Nagpur municipal corporation
नागपूर : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर उपद्रव शोध पथक सक्रिय
thieves stole Metro pole in Shivajinagar area are arrested
शिवाजीनगर भागात मेट्रोचे खांब चोरणारे गजाआड, सुरक्षारक्षकाच्या तत्परतेमुळे चोरीचा प्रकार उघड
crime increased in Nagpur
लोकजागर : पोलीस करतात काय?
वाकडमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा; १३७ शेड, १८ घरे जमीनदोस्त
accused ran away, Jaripatka police, Nagpur ,
नागपूर पोलिसांवर नामुष्की, पळून गेलेला आरोपी गेला कुठे?
three suspect arrested in attempted kidnapping school boy
उमराळ्यात शाळकरी मुलास पळविण्याचा प्रयत्न; तीन संशयितांना अटक

हेही वाचा… दिवाळीपूर्वी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केळी पीकविमा रक्कम; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

तेथे पाहणी केली असता शेतात तूर आणि कापूस या पिकांच्या मध्यभागी गांजाची लागवड केल्याचे आढळून आले. यावेळी त्या भागातील स्थानिकांनी पोलिसांना विरोध केला. परंतु, पथकाने स्थानिक पोलिसांची मदत घेत तीन कोटी १० लाख रुपयांची सहा हजार दोन किलो वजनाची एक हजार ८६० गांजाची झाडे जप्त केली. या कारवाईमुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी स्थानिक गुन्हे शाखेला २० हजारांचे बक्षीस दिले.

Story img Loader