पारोळा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील सत्यनारायण मंदिरासमोरील गोदामात बनावट देशी मद्यनिर्मितीचा कारखाना नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने २४ डिसेंबर रोजी मध्यरात्री छापा टाकत उद्ध्वस्त केला. बनावट मद्यासह तीन मालमोटारी, कच्च्या माल यासह एक कोटी ६४ लाख १६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत बारा ते पंधरा जणांना अटक केली असून, मुख्य संशयितांसह चार-पाच जण फरार आहेत. याप्रकरणी बावीसहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा- नाशिक : वेगवेगळ्या घटनांत दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Rohit Pawar scandal regarding 32 IT companies in Hinjewadi
“हिंजवडी मधील ३२ आयटी कंपन्या गुजरातला जाणार”; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, गेल्या दहा वर्षात एक ही…!
maharashtra pollution control board to submit report to ngt on noise pollution
सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल
world eyes on donald trump dealing with big tech during his second term of us president
बलाढ्य टेक कंपन्यांसाठी ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ काय ?
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत
Adulterated food pune, Food and Drug Administration pune, Diwali, Adulterated food,
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा लाखोंचा बाजार! पुणे विभागात दसरा, दिवाळीत अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
Unauthorized parking lots, dhabas, Dronagiri,
उरण : द्रोणागिरी, पुष्पकनगरमध्ये अनधिकृत वाहनतळ, ढाबे

बनावट मद्यनिर्मितीत पारोळा तालुका अग्रेसर असून, यापूर्वीही असे अनेक कारखाने राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने २४ डिसेंबर रोजी मध्यरात्री पारोळा येथील पालिका हद्दीतील धुळे- नागपूर महामार्गालगत असलेल्या गट क्रमांक १८१ मधील खुले भूखंड क्रमांक एक, दोन व तीन यातील पत्र्याच्या गोदामामध्ये छापा टाकत बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. त्यात पथकाने रॉकेट देशी दारू संत्रा ब्रँडचे 37 हजार 200 बनावट पत्री बुच, देशी दारू टँगो पंचचे चार हजार बनावट पत्री बुच, रॉकेट देशी दारू संत्रा ब्रँडचे एक लाख 55 हजार 500 बनावट कागदी लेबल, देशी दारू टँगो पंचचे साठ हजार बनावट कागदी लेबल, एक आरओ यंत्र, 90 मिलिलिटर क्षमतेच्या 24 हजार 220 रिकाम्या बाटल्या, 800 लिटर एसिटोनसदृश्य द्रावण, रबरी नळी, पाण्याचे मोटार, दोनशे लिटर क्षमतेचे चोवीस प्लास्टिक ड्रम स्पिरीट, साडेतीनशे फूट लांबीची वायर, प्लास्टिकचे शंभर ट्रे, नऊ भ्रमणध्वनी संच, दहाचाकी टाटा कंपनीची मालमोटार सहाचाकी आयशर कंपनीची मालमोटार असा सुमारे एक कोटी 64 लाख 162 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा- जळगावातून फेब्रुवारीपासून विमानसेवा सुरु होणार

संशयित महेश पाटील (रा. जवखेडे, ता. अमळनेर, जि. जळगाव), सुदामगिर गोसावी (रा. भाटपुरा, ता. शिरपूर, जि. धुळे), प्रेमसिंग जाधव (रा. रोहिणी, ता. शिरपूर, जि. धुळे), महेंद्र पाटील (मु. पो. गुढे, ता. भडगाव, जि. जळगाव), राजू जाधव (रा. मु. पो. धवली, ता. वरला, जि. बडवानी, मध्य प्रदेश), प्रदीप पावरा (रा. मु. मोहिदा, पो. पळासनेर, ता. शिरपूर, जि. धुळे), दीपक पावरा (रा. मु. दुधखेडा, ता. वरला, जि. बडवानी, मध्य प्रदेश), रंजित पावरा (रा. मु. गधाडदेव, पो. मालकातर, ता. शिरपूर, जि. धुळे), प्रताप पावरा (रा. मु. मोहिदा, पो. पळासनेर, ता. शिरपूर, जि. धुळे), सतीश पावरा ( रा. मोहिदा, पो. पळासनेर, ता. शिरपूर, जि. धुळे), प्रकाश पावरा (रा. मु. मोहिदा, पो. पळासनेर, ता. शिरपूर, जि. धुळे), राकेश पावरा (रा. मु. मोहिदा, पो. पळासनेर, ता. शिरपूर, जि. धुळे), दयाराम बारेला (मु. धवर्ला, ता. वरला, बडवानी, मध्य प्रदेश), रामगिर गोसावी (रा. भाटपुरा, ता. शिरपूर, जि. धुळे), भीमसिंग चव्हाण, (रा. मु. तांडा, पो. धवर्ला, ता. वरला, बडवानी, मध्य प्रदेश), सुरेश राठोड (रा. रोहिणी, ता. शिरपूर, जि. धुळे), नीलेश पावरा (रा. मु. मोहिदा, पो. पळासनेर, ता. शिरपूर, जि. धुळे) यांना अटक करण्यात आली आहे. मुख्य संशयित समाधान चौधरी (रा. पारोळा, जि. जळगाव), संशयित सुधाकर पाटील (रा. वर्धमाननगर, उंदीरखेडा रोड, ता. पारोळा, जि. जळगाव), प्रदीप पवार (रा. आर. एल.नगर, अमळनेर रोड, ता. पारोळा, जि. जळगाव), राहुल अहिरराव (रा. धुळे) हे फरार झाले आहेत.

हेही वाचा- नाशिक : वेगवेगळ्या घटनांत दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

दरम्यान, बनावट देशी मद्यनिर्मितीचा कारखाना बड्या राजकीय नेत्यांच्या पाठबळाशिवाय सुरू असल्याची चर्चा आहे. विशेष बाब म्हणजे स्थानिक पोलिसांना यासंदर्भात कशी माहिती नव्हती, असा प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे.