नाशिक – नाशिक ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर एका वाहन चालकाला लुटण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर गवंडगाव टोल नाक्याजवळ अशोक निकम हे चारचाकी वाहनात आराम करीत असताना संशयित सुकदेव मोरे (२७, रा. राहता) आणि विकास कांबळे (२४, रा. राहता) यांनी गाडीची काच फोडून वाहनात प्रवेश केला. कोयत्याचा धाक दाखवित निकम यांच्याकडे असलेले दोन हजार रुपये, पाच हजार रुपयांचा भ्रमणध्वनी, चार हजार ३०० रुपये असा २३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेला.
हेही वाचा – विश्लेषण: त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशाचा वाद काय आहे? त्या दिवशी नेमके काय घडले?
या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.