नाशिक – अंबड औद्योगिक वसाहतीत मलजल प्रक्रिया केंद्रास तातडीने मंजुरी द्यावी, त्वरीत केंद्र उभे करावे तसेच गेल्या २० वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, या मागण्यांसाठी सोमवारपासून अंबड येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मंत्रालयाच्या दिशेने मोर्चा निघाला होता. बुधवारी हा मोर्चा इगतपुरीजवळील घाटनदेवी परिसरात पोलिसांनी अडविला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला. मोर्चेकरी शहरात परतल्यावर महापालिका आयुक्तांशी मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली.

अंबड-सातपूर प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर, बंडोपंत दातीर. शांताराम फडोळ. माजी नगरसेवक राकेश दोंदे आदींनी अंबड, सातपूर परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्ये येणाऱ्या अडचणी, मलजल प्रक्रिया केंद्राची गरज, शेतकऱ्यांना बजावण्यात आलेल्या नोटीसा आदी विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी दोनशे शेतकऱ्यांसह सोमवारी मंत्रालयाकडे पायी कूच केले होते. हा मोर्चा बुधवारी इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी परिसरात आला असता अप्पर अधीक्षक सुनील भामरे यांनी मोर्चेकऱ्यांशी संवाद साधला. पोलिसांच्या मध्यस्तीनंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. मोर्चेकरी माघारी वळले. नाशिक येथे आल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी महापालिका आयुक्तांचे कार्यालय गाठले. आयुक्त भाग्यश्री बानायत यांच्याशी मागण्यांविषयी चर्चा करण्यात आली. यातील काही मागण्या तांत्रिकदृष्ट्या सुटण्यास वेळ लागणार आहे. मंत्रालय स्तरावर सोडविवण्यासारख्या विषयांची माहिती घेत वरिष्ठ स्तरावर कार्यवाहीसाठी ते पाठविण्यात येतील, असे आश्वासन बानायत यांनी दिले.

Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Girish Mahajan On Nashik Guardian Minister
Girish Mahajan : नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत गिरीश महाजनांचं मोठं विधान; म्हणाले, “…म्हणून आम्ही मागणी केली होती”
Tina Dabi barmer
‘घरी यायला-जायला हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याची IAS टीना डाबी यांच्याकडे अजब मागणी; कारण ऐकून बसला धक्का
Shetkari sangharsh samiti demands cancellation of Pune-Nashik Industrial Expressway pune
पुणे- नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग रद्द करावा; शेतकरी संघर्ष समितीची मागणी
Two attempted self immolations occurred in Jalgaon and Nashik districts on Republic Day January 26
जळगाव, नाशिक जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनी दोघांचा पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
Guardian Minister Shivendra Singh Raje Bhosle Mitra Mandal circle of friends latur
लातूरामध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र मंडळाची ‘अचानक’ स्थापना
Ajit Pawar on dowry
Ajit Pawar : सामूहिक लग्न सोहळ्यामुळे हुंड्यासारख्या प्रथा बंद होतात – उपमुख्यमंत्री अजित पवार

हेही वाचा >>>दोन द्राक्ष बागायतदारांची जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून फसवणूक

दरम्यान, शेतकऱ्यांना बजावण्यात येणाऱ्या नोटीसा, लादण्यात येणारी घरपट्टी, पाणीपट्टी, खड्डेयुक्त रस्ते या विषयांवरही आयुक्तांशी चर्चा झाली. महापालिका प्रशासन स्तरावर या प्रश्नांची सोडवणूक लवकर न झाल्यास घाटनदेवी परिसरातून पुन्हा एकदा मोर्चा काढण्याचा इशारा साहेबराव दातीर यांनी दिला. या बैठकीस शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

हेही वाचा >>>माहिती आयोगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न, महिलेविरुध्द गुन्हा

सुरक्षारक्षकांशी मोर्चेकऱ्यांचा वाद

अंबड- सातपूर प्रकल्प संघर्ष समितीचे मोर्चेकरी नाशिक महापालिका मुख्यालयात आल्यावर सर्व शेतकरी आयुक्तांच्या दालनात जाण्याचा प्रयत्न करु लागले. त्यामुळे प्रवेशद्वारावरच सुरक्षा रक्षकांशी त्यांचा वाद झाला. अखेर मोर्चेकऱ्यांचे शिष्टमंडळ बैठकीसाठी दालनात गेले.

Story img Loader