नाशिक – जिल्ह्यातील नामांकित शैक्षणिक संस्थेत नोकरीचे आमिष दाखवित एका युवा शेतकऱ्याला नऊ लाख ५० रुपयांना फसविण्यात आले आहे. या प्रकरणी तीन संशयितांविरुद्ध मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल आजगे (३२, रा.जळगाव) यांना तीन संशयितांनी मालेगाव येथील महात्मा गांधी विद्यामंदिर शैक्षणिक संस्था आणि आदिवासी सेवा समिती शिक्षण संस्था येथे शिक्षक पदावर नियुक्त करण्यात येईल, असे आमिष दाखविले. अमोल यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी नऊ लाख ५० हजार रुपये उकळले.

हेही वाचा – धुळे: नऊ गाड्यांना धडक देत कंटेनर थेट हाॅटेलमध्ये; शिरपूर अपघातातील मृतांची संख्या १२ पर्यंत, ४० जखमी

संशयितांनी पैसे घेतले. परंतु, नोकरी लावून दिली नाही. नोकरीही नाही आणि पैसेही गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आजगे यांनी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या शैक्षणिक संस्थेशी संबंधित फसवणुकीचा पाचवा गुन्हा दाखल असताना पोलीस तसेच शैक्षणिक संस्थेकडून अद्याप आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Story img Loader