एरंडोल तालुक्यातील तळई येथे आयोजित बारा गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमात चाकाखाली सापडून गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.राहुल पंडित पाटील (३०, तळई) असे या मृत युवकाचे नाव आहे. एरंडोल तालुक्यातील तळई येथे चंपाषष्ठीनिमित्त सायंकाळी उशिरा बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. या ठिकाणी राहुल पाटील मित्रासोबत उभा होता. बारा गाड्या ओढताना राहुलला गर्दीत धक्का लागून तो खाली पडला. बारा गाड्यांच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाला.

हेही वाचा >>>जळगाव: दोन्ही मुलीच आल्याने पत्नीचा खून करुन आत्महत्या

ग्रामस्थांनी त्याला तातडीने जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. राहुल पाटील हा जिल्हा बँकेच्या एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील शाखेत लिपिक म्हणून नोकरीला होता. दोन वर्षांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Story img Loader