नाशिक: सिन्नर येथे बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर शिवशाहीच्या चाकाखाली सापडून युवकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला.

विजय मोरे (४२. रा. सातपीर गल्ली, सिन्नर) असे मयताचे नाव आहे. पालघर आगाराची शिर्डी-पालघर ही शिवशाही बस शुक्रवारी सकाळी शिर्डीहून आल्यानंतर सिन्नर स्थानकात जात असता हा अपघात झाला. मोरे हे सकाळी फिरण्यासाठी बाहेर गेले होते. घरी परतत असताना ते पालघर आगाराच्या बसखाली सापडले. डोक्यावरून चाक गेल्याने मोरे यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा… मालेगाव महापालिका आयुक्तपदी रवींद्र जाधव

या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात चालक जगदीश पाटील (३८, रा. पालघर) यांच्याविरूध्द गुन्हा नोंदवला आहे. मोरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई, दोन भाऊ असा परिवार आहे.

Story img Loader