धुळे शहराजवळील मोहाडी येथील रिक्षा चालक सतीश मिस्तरी या युवकाच्या खूनाचा अवघ्या १२ तासात उलगडा करण्यात मोहाडी पोलिसांना यश आले असून त्यांनी एका अल्पवयीन मुलासह दोघांना अटक केली आहे. बहिणीची बदनामी केल्याच्या रागातून दोघांनी सतीशचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- धुळे : तपासणी नाक्यावर वाहनातून १२ तलवारींसह प्राणघातक हत्यारे जप्त; ११ संशयितांना अटक

सतीश मिस्तरी (३४, रा.नित्यानंद नगर, मोहाडी उपनगर, धुळे) या रिक्षा चालकाचा मृतदेह गुरुवारी सकाळी अवधान परिसरात मोकळ्या जागेत मिळून आला होता. मृतदेहाला मुंडके नसल्याने ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. मृताच्या हातावर सतीश नाव गोंदलेले होते. त्यावरुनच त्याची ओळख पटली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मोहाडीचे सहायक निरीक्षक भूषण कोते, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी सतीशच्या मित्रांची आणि त्याच्या घराजवळ कोण वास्तव्यास आहे, याची संपूर्ण माहिती घेतली. त्यात चेतन गुजराथी हा सतीशचा शेजारी त्याचा मित्र होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. चेतनच्या बहिणीविषयी सतीश हा उलटसुलट चर्चा करुन तिची बदनामी करीत असल्यानेच चेतनसह दोघांनी सतीशला मारल्याचे स्पष्ट झाले. अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक हेमंत पाटील, सहायक निरीक्षक कोते यांच्यासह पथकाने या खुनाचा अवघ्या १२ तासात तपास पूर्ण केला.