नाशिक – राज्यात अवकाळी पावसामुळे ओल्या दुष्काळासारखी स्थिती आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची आमची मागणी आहे. राजकारण बाजूला ठेवून समाज म्हणून सर्वांनी शेतकऱ्यांसाठी एकत्र येण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी राज्यभर दौरे करुन याप्रश्नावर आवाज उठविण्यात येईल, असे शिवसेना नेते आ. आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी केली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका केली. समृध्दी महामार्गाचा गाजावाजा होत असला तरी त्याचे काम चांगले झालेले नाही. राज्याच्या विकासाच्या गप्पा मारल्या जात असतांना गावोगावी रस्तेच नाहीत. शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. वातावरण बदला मुळे अतिवृष्टीसारखी संकटे उभे राहतात. अद्याप नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यांची खदखद बाहेर येत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
CM Devendra Fadnavis and Pankaj Bhoyar will visit Datta Meghes residence in Khamla
असा गुरु, असा शिष्य! मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रथम भेट सावंगीत…
There will be investigation into bogus crop insurance case says Devendra Fadnavis
तर पीक विम्याच्या बोगस प्रकरणाची सखोल चौकशी- देवेंद्र फडणवीस
Vijay Wadettiwar On Bmc Election 2025
Vijay Wadettiwar : ‘मविआ’त बिघाडी? महापालिकेच्या निवडणुकीबाबत ठाकरे गटाचे स्वबळाचे संकेत; वडेट्टीवार म्हणाले, ‘त्यांच्या पक्षाची…’
Aditya Thackeray, Aditya Thackeray on Marathi people Flat , kalyan Marathi Family Case,
मराठी भाषिकांना फ्लॅट न देणाऱ्यांवर कारवाई करा – आदित्य ठाकरे
Aditya Thackeray criticizes Amit Shah,
केंद्रीय गृहमंत्र्यांवर आदित्य ठाकरेंचा निशाणा; म्हणाले,”भारत जोडो यात्रेत नक्षलवादी होते तर…”
Pune Pigeon grain, Pune Pigeon,
पुणे : पारव्यांना धान्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, वसूल केला इतक्या हजारांचा दंड !

हेही वाचा >>> जळगाव : शिंदे यांचीच शिवसेना खरी ; गिरीश महाजनांचा दावा; उद्धव ठाकरेंवर घणाघात

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर लक्ष्मीचे चित्र असावे, अशी मागणी केली असल्यासंदर्भात विचारले असता ठाकरे यांनी नोटा लोकांच्या हातात पोहचणे महत्वाचे असल्याचे सांगितले. ५० खोके गद्दारांच्या घरी पोहचले. लोकांच्या मदतीसाठी त्यांचा उपयोग झाला नाही. पैसा, सत्तेचा वापर करुन सामान्य माणसांचा आवाज दाबला जात आहे. लोकांना कृषिमंत्री माहीत नाहीत. तसे आम्हाला मुख्यमंत्री माहीत नाहीत. ते आम्हांला दिसत नाहीत. लोकांचा आवाज ऐकणे गरजेचे आहे. आपत्ती, संकट येत असतात. त्यांना तोंड देणे महत्वाचे आहे. हे सरकार काम करत नसल्याचे दिसत आहे. शेतीच्या बांधावर आल्यावर शेतकऱ्यांचे दुःख काय आहे, ते कळते, अशी टीका ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.

शेतकऱ्यांचा धीर सुटत चालला आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांसाठी आपल्याला उभे राहावे लागेल. खाते वाटप होऊन, बंगल्यांचे वाटप होऊन समस्या सुटणार आहेत का, दिवाळी शिधा वाटपात सर्व वस्तू मिळाल्या का, असे प्रश्न उपस्थित करुन यासंदर्भातील निविदा किती दराने दिली याची माहिती घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader