नाशिक – शहरातील प्रसिद्ध अशा आधार आश्रमातातील विशेष काळजी बालक असलेली आशी ही दत्तकविधान प्रक्रिया पूर्ण झाल्याने सातासमुद्रापार असलेल्या पालकांच्या कुशीत विसावली. दत्तक विधानाची शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आशी अमेरिकन पालकांकडे झेपावल्यावर उपस्थित सर्वच भावनाशील झाले होते.

महिला व बालविकास विभागाच्या मान्यताप्राप्त आधाराश्रमात अनाथ आणि निराधार बालकांच्या संगोपन, पुनर्वसनाचे काम करण्यात येते. केंद्रीय दत्तक ग्रहण संशोधन (सीएआरए) यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियम २०२२ लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व नियमांची पूर्तता करून मंगळवारी आधाराश्रम संस्थेतील आशी या बालिकेला अमेरिकेतील दाम्पत्याने जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या उपस्थितीत दत्तक घेतले. जिल्हाधिकारी यांच्या दालनात आशी हिला दत्तक बालिकासंदर्भातील कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून डेव्हिन जमशेदी आणि लायनी जमशेदी यांच्या स्वाधीन करण्यात आले.

Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
canada tourist visa
कॅनडाने १० वर्षांचा टुरिस्ट व्हिसा का थांबवला? कॅनडाला वारंवार भेट देणार्‍या नागरिकांवर होणार परिणाम?
Ajit Pawar Jayant Patil x
Jayant Patil : “अरे बाप नाही, तुझा काकाच…”, जयंत पाटलांचं अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर
thane district home voting
ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…

हेही वाचा – “शांतता समितीत युवावर्गाने सहभाग घ्यावा”; नाशिक पोलीस आयुक्तांचे आवाहन

जमशेदी हे कुटुंब अमेरिकेत स्थायिक असून, या दाम्पत्यास मुलगा आणि मुलगी असे जुळे आहेत. आशी हिला जन्मत: एकच मूत्रपिंड असून तिची जीभ टाळूला चिटकलेली असल्याने शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. दत्तक नियमावलीनुसार असे बालक विशेष काळजी बालक म्हणून घोषित केले जात असून ते पालकांना दत्तक म्हणून दिले जाते. त्यानुसार जमशेदी दाम्पत्याला जुळे असतानाही त्यांनी विशेष काळजी बालक दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. आठ महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरू होती. अखेर ही प्रक्रिया पूर्ण झाली. नवीन दत्तक नियम प्रणाली सुरू झाल्यानंतरची ही पहिलीच आंतरदेशीय दत्तक प्रक्रिया नाशिक जिल्ह्यातून पूर्ण झाली आहे. आजपर्यंत देशांतर्गत या स्वरुपाचे चार आदेश जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पारित करण्यात आले आहेत, अशी माहिती आधार आश्रमाचे समन्वयक राहुल जाधव यांनी दिली आहे.

हेही वाचा – नाशिक : युवारंग युवक महोत्सवात मू.जे. महाविद्यालय विजेते

आशी हिला दत्तक देतेवेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महिला व बालविकास अधिकारी अजय फडोळ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भुषण काळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समीरा येवले, परिवक्षा अधिकारी प्रियंका पानपाटील, आधाराश्रमाचे व्यवस्थापक तथा समन्वयक राहुल जाधव आदी उपस्थित होते.