लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेम यास रात्री नाशिकहून कडेकोट बंदोबस्तात दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यासाठी रेल्वेने नेण्यात आले. या कार्यवाहीसाठी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाबाहेर आणि रेल्वे स्थानक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कैदी पार्टीत ४४ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बरोबर वैद्यकीय पथकही आहे.

साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेम महिनाभरापासून नाशिकरोड कारागृहात आहे. तत्पूर्वी तो तळोजा कारागृहात होता. दिल्लीतील न्यायालयाने सालेमला हजर करण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयीन प्रक्रियेतील हा नियमित भाग आहे. त्यानुसार कारागृह प्रशासनाने रात्री सालेमला नाशिक शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. कारागृह प्रशासनाची जबाबदारी कारागृहापर्यंत असते. पुढील जबाबदारी स्थानिक पोलिसांची असते. यामुळे लॅमरोडवरील कारागृहाबाहेरील परिसरास अक्षरश: पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरातही रेल्वे पोलीस, लोहमार्ग पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.

आणखी वाचा-Dhule Leopard News: धुळे शहरात संचार करणारा बिबट्या अखेर जेरबंद

दिल्लीतील न्यायालयात सालेमला हजर करण्यासाठी नेताना शहर पोलिसांचा कैदी पार्टीत बंदोबस्त आहे. रात्री रेल्वेने सालेमला दिल्लीला नेण्यात आले. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव नाशिकरोड कारागृहात सालेमला ठेवलेले आहे. परंतु, सालेमने पुन्हा तळोजा कारागृहात हलविण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी त्याने न्यायालयात याचिकाही दाखल केली होती, असे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abu salem set off from nashik to delhi by train mrj
Show comments