परीक्षा नियंत्रकांकडून तीन दिवसांत निकाल लावण्याचे आश्वासन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने तीन दिवसात विद्यार्थ्यांंचे नव्याने निकाल लावण्याचे आश्वासन दिल्याची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सहमंत्री विराज भामरे यांनी दिले आहे. अभाविपने येथील विद्यापीठ उपकेंद्रात आंदोलन के ले. याप्रसंगी भामरे यांनी परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केल्यानंतर त्यांना हे आश्वासन देण्यात आले.

करोना महामारीमुळे यावर्षी ऑनलाइन परीक्षा झाल्याने विद्यार्थ्यांंना तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागले. १२ नोव्हेंबर रोजी निकाल लागल्यानंतरही विद्यार्थ्यांंना परीक्षा देऊन देखील गैरहजर दाखविणे, सरसकट सर्व विद्यार्थ्यांंना शून्य गुण दाखविणे यासारख्या तांत्रिक अडचणी आल्या होत्या. यात अभाविप नाशिकने वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा केला. परंतु, कोणताही सकारात्मक निर्णय न झाल्याने अभाविपने सोमवारी पुणे विद्यापीठाच्या उपके ंद्रात ठिय्या आंदोलन के ले. यंदा करोनामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा गोंधळ झाला. परीक्षा झाल्या. परंतु, विद्यापीठाच्या परीक्षा देताना विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागले.

तृतीय वर्ष वाणिज्य शाखेची अर्थशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका २० ऑक्टोबर रोजी देताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. संके तस्थळावर लॉग इन करण्यात अडथळा येणे, उशिरा लॉग इन होणे, त्यानंतर पुन्हा लॉग आऊट होणे, पुन्हा लॉग इन केल्यानंतर उत्तरांचे क्रम बदलणे, वेळ संपल्यावर परीक्षा सबमिट झाली असा संदेश येणे, उशिरा लॉग इन झाल्याने वेळ कमी मिळणे, अशा समस्या आल्या.

अभाविपने या विषयावर सोमवारी सलग तीन तास आंदोलन के ले. अभाविपच्या शिष्टमंडळाने पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचे समन्वयक डॉ. प्रशांत टोपे, विद्यापीठ परीक्षा नियंत्रक महेश काकडे आणि सिनेट सदस्य विजय सोनवणे यांच्याशी चर्चा केली.

यावेळी शेकडो विद्यार्थ्यांंसह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सहमंत्री विराज भामरे, नाशिक जिल्हा संयोजक अथर्व कुळकर्णी, नाशिक महानगर सहमंत्री सिद्धेश खैरनार , राकेश साळुंके, नगर मंत्री सौरभ धोत्रे, ओम मालुंजकर आदींसह विद्यार्थी परिषदेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.