नाशिक – वयाचे आणि शिक्षेचे निकष पूर्ण करणाऱ्या कैद्याला सोडण्यासाठी लागणारे योग्यता प्रमाणपत्र देण्याकरिता ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आबिद अत्तार आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा >>> पावसाळ्यात रस्ते कामामुळे समस्या; नाशिक वाचवा समितीचे एकावेळी एकच काम करण्याचे आवाहन

nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
In four cases of burglary in different parts of Nashik city more than 30 lakhs lost
नाशिक शहरात घरफोडीचे सत्र, ३० लाखहून अधिकचा ऐवज लंपास
nashik case filed against three individuals for causing accident by transporting iron bars
नाशिक अपघातास कारणीभूत तिघांविरुध्द गुन्हा, सळई पुरवठादाराचाही समावेश
nashik md drugs loksatta
नाशिक : अमली पदार्थ विक्री प्रकरणी तीन महिलांसह चौघे ताब्यात
nashik hotel gun on servant
नाशिक : हॉटेलमधील नोकरावर बंदूक रोखणाऱ्या पोलिसाचे निलंबन ?
nashik land purchase fraud
नाशिक : हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या नावाने फसवणूक, दोन जणांविरुद्ध गुन्हा
Does the government want to resolve the Pathi dispute or not
सरकारला पॅथींचा वाद सोडवायचा आहे की नाही?

या प्रकरणातील तक्रारदार नाशिकरोड कारागृहात शिक्षा भोगत आहे. शासकीय नियमाप्रमाणे ज्या बंदी कैद्याचे वय ६५ पेक्षा जास्त आहे, तसेच ज्या कैद्याने १४ वर्षे शिक्षा भोगली आहे, अशा कैद्यांना शासनाने नेमून दिलेली समिती सोडून देते. परंतु, अशा कैद्यांना बाहेर सोडण्यासाठी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या योग्यता प्रमाणपत्राची गरज असते. तक्रारदाराच्या मित्राला हे प्रमाणपत्र हवे होते. नाशिकरोड कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आबिद अत्तार (४०) आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार यांनी हे प्रमाणपत्र देण्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीत ३० हजार रुपये ठरले. याबाबत तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला.

हेही वाचा >>> महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार

तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना डॉ. अत्तार आणि डॉ. खैरनार या दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याविरुध्द मुंबई नाका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर तपास पथकाने संशयितांच्या शासकीय निवासस्थानाची झडती घेतली. त्यात डॉ. अत्तार यांच्या घरात सुमारे अडीच लाख तर, डॉ. खैरनार यांच्या घरात सात लाखाचे दागिने व मौल्यवान वस्तू आढळल्या. सोमवारी संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून स्वप्नील राजपूत व सहायक सापळा अधिकारी म्हणून राजेंद्र सानप यांनी काम पाहिले. पथकात हवालदार प्रभाकर गवळी, प्रफुल्ल माळी, संतोष गांगुर्डे, पोलीस नाईक किरण धुळे यांचा समावेश आहे.

Story img Loader