धुळे – लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने येथील पंचायत समितीमधील बांधकाम विभागाच्या कनिष्ठ सहायकास सोमवारी दुपारी साडेतीन हजार रुपयांची लाच घेताना पकडले. कनिष्ठ सहायकाची हिंमत इतकी की थेट शाखा अभियंत्यांकडूनच लाच मागितल्याचे उघड झाले.  धुळे पंचायत समितीमधील शाखा अभियंता तथा तक्रारदार हे एप्रिल २०२२ पर्यंत रतनपुरा बीट येथे नेमणुकीस होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> शेतकऱ्यांचे अनुदान गोठविण्याची बँकांची दंडेली, शासनाचा आदेश धाब्यावर

या कालावधीत या बीटचे विभागीय लेखा परीक्षण झाले होते. या लेखा परीक्षणाच्या नावाने बक्षीस म्हणून बांधकाम विभागातील कनिष्ठ सहायक शामकांत सोनवणे याने तक्रारदाराकडे साडेतीन हजार रुपयांची लाच मागितली. या संदर्भात धुळे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे सोनवणेविरुध्द तक्रार झाली. यानंतर पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्यासह निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण, हवालदार भूषण खलाणेकर, शरद काटके, गायत्री पाटील, रोहिणी पवार यांनी पंचायत समिती आवारातून सोनवणेला तक्रारदाराकडून साडेतीन हजार रुपयांची लाच घेताना पकडले. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात सोनवणेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acb caught junior assistant of construction department in panchayat samiti for accepting bribe zws
Show comments