शहर परिसरात अपघाताचे सत्र सुरू असून अंबड व पंचवटी परिसरात घडलेल्या अपघाताच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. त्यात अंबड येथील राजेश पवार व पंचवटी येथील सोमनाथ ठाकरे यांचा समावेश आहे.
डीजीपी नगर येथे राहणारे राजेश माधवराव पवार (३४) हे आपल्या दुचाकीने पत्नी, मुलीसमवेत जात होते. वेगावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरली. या वेळी पवार यांना जबर मार बसला, तर मुलगी व पत्नी जखमी झाली. दवाखान्यात नेत असतानाच पवार यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा अपघात मखमलाबाद रस्त्यावरील शांतीनगर चौकात घडला. दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सोमनाथ ठाकरे (४६) हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेगवेगळ्या अपघातांत दोन दुचाकीस्वार ठार
अपघाताच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला.
Written by मंदार गुरव
First published on: 26-11-2015 at 01:26 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident in nashik