नंदुरबार- जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर कोंडाईबारी घाटात एका मालमोटारीने मेंढ्यांना धडक दिली. या अपघातात शंभरपेक्षा अधिक मेंढ्या मृत्युमुखी झाल्या असून महामार्गावर मेंढ्यांच्या मृतदेहांचा खच पडला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी रविवारी सकाळी हा अपघात झाला. साक्री तालुक्यातील विजापूर येथील मेंढपाळ महामार्गाने गुजरात राज्यात मेंढ्या घेऊन जात असताना आंध्र प्रदेश राज्यातील ट्रकचालक  मागून मेंढ्यांना  चिरडले आहेत दहिवेलहून विसरवाडीच्या दिशेने जाणाऱ्या मालमोटार मेंढ्यांना चिरडतच पुढे गेली. या अपघातात शंभरपेक्षा अधिक मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. मालमोटार चालक आंध्र प्रदेश राज्यातील होता. या अपघातात मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. चालकास विसरवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident involving truck and sheep in nandurbar district amy