लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: शहर परिसरातील गुन्हेगारीविरोधात पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ (दोन) क्षेत्रात राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत ३१ टवाळखोरांविरुध्द कारवाई करण्यात आली.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी सुरु केलेल्या प्रयत्नातंर्गत परिमंडळ दोनमधील सातपूर, अंबड, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत तपासणी मोहीम राबविण्यात आली. उपआयुक्त मोनिका राऊत यांनी मार्गदर्शन केले. नोंदीतील तसेच तडीपार अशा ३७ गुन्हेगारांची घरझडती घेण्यात आली. ३१ टवाळखोरांविरुध्द कारवाई केली. कोटपा कायद्यान्वये १८ प्रकरणे दाखल करण्यात आले. इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या देशी दारू विकणाऱ्याकडून ८४० रुपयांचा माल जप्त करुन गुन्हा दाखल केला. चोरीच्या गुन्ह्यात हवा असलेल्या एकास अटक करण्यात आली.

आणखी वाचा-नाशिक: मणिपूर अत्याचार निषेधार्थ एकलव्य संघटनेचा मोर्चा

मोटार वाहन कायद्यान्वये तीन जणांकडून १२०० रुपये दंडात्मक वसुली करण्यात आली. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्यावे आवाहन उपायुक्त राऊत यांनी केले आहे.