नाशिक – सराईत गुन्हेगार गणेश उर्फ छकुल्या वाघमारेला वर्षभरासाठी स्थानबद्ध केल्यानंतर आता नाशिकरोड परिसरातील कूप्रसिद्ध घोड्या तोरवणे याच्यावर पुन्हा एकदा एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सराईत गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. आता पुढील कारवाई कुणावर होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सचिन उर्फ घोड्या तोरवणे (२७, सिध्देश्वरनगर, जुना सायखेडा रोड, जेलरोड) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. त्याची नारायण बापूनगर, लोखंडे मळा, दसक, जुना सायखेडा रोड, जेलरोड आणि नाशिकरोड परिसरात दहशत आहे. धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटमार, जबर दुखापत, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, गैर कायद्याची मंडळी जमवून मारहाण करणे, दहशत निर्माण करणे असे विविध गुन्हे त्याच्या नावावर आहेत. २०१९ मध्ये शहर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई केली होती. मात्र कारागृहातून बाहेर पडताच त्याने पुन्हा आपले वर्चस्व कायम राहण्यासाठी गुन्ह्यांची मालिका सुरू केली.

Wildlife scientists and animal researchers claim about the golden fox thane news
मानवी वस्तीत येणारे सोनेरी कोल्हे निवासीच! वन्यजीव शास्त्रज्ञ, प्राणी अभ्यासकांचा दावा
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
In four cases of burglary in different parts of Nashik city more than 30 lakhs lost
नाशिक शहरात घरफोडीचे सत्र, ३० लाखहून अधिकचा ऐवज लंपास
Makar Sankranti motorcyclist died after nylon manja got stuck in his neck
नाशिकमध्ये नायलाॅन मांजामुळे युवकाचा मृत्यू
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
Nashik, Kumbh Mela , meeting ,
नाशिक : कुंभमेळा तयारीसाठी लवकरच स्थानिक पातळीवर बैठक, संशयास्पद भूसंपादनाची चौकशी
nashik case filed against three individuals for causing accident by transporting iron bars
नाशिक अपघातास कारणीभूत तिघांविरुध्द गुन्हा, सळई पुरवठादाराचाही समावेश

हेही वाचा – धुळे जिल्ह्यात बनावट डॉक्टर शोधण्यासाठी मोहीम

शहरातील उपनगरसह धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी त्याच्यावर पुन्हा एकदा स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात त्याला दाखल करण्यात आले आहे. शहर पोलिसांची या वर्षातील ही दुसरी कारवाई आहे. यापूर्वी सराईत गणेश उर्फ छकुल्या वाघमारे याला स्थानबद्ध करण्यात आले आहे.

हेही वाचा – नाशिक : राज्य परिवहन कार्गो सेवेमार्फत शिक्षण मंडळाच्या पुस्तक वितरणाचे काम

शहरात सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल, असे गुन्हेगारी कृत्य करून जनजीवन विस्कळीत करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मदत होणार आहे. शहरातील जनजीवन विस्कळीत करणाऱ्या आणि समाज स्वास्थ बिघडविणाऱ्या गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यातील तरतुदीनुसार यापुढेही प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई केली जाणार असल्याचे शहर पोलिसांनी म्हटले आहे.

Story img Loader