नाशिक – पेठरोड येथील जुगार अड्ड्यावर पत्ते एस खेळणाऱ्या ३७ जणांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा विभाग एकने कारवाई केली. एक लाख २८,७२० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.स्थानिक गुन्हे शाखा विभाग एकला पेठ फाटा सिग्नलजवळ बी झेड प्लाझा गाळ्यात अनिल जाधव हा काही जणांना जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती मिळाली.
पथकाने छापा टाकला असता सुभाष गायकवाड (३५), सुकदेव अंतुले (३५), निरंजन सोमानी (४०) यांच्यासह ३७ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी जुगाराचे साहित्यव रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला. यापुढेही कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.