जळगाव शहरातील शांतता अबाधित राहण्यासह गुन्हेगारीवर लगाम लावण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून शहरातील बावरी टोळीतील पाच जणांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिले आहेत.पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, मोनूसिंग बावरी (२३), मोहनसिंग बावरी (१९), सोनूसिंग बावरी (२५), जगदीशसिंग बावरी (५२), सतकौर बावरी (४५, रा. सद्गुरू कॉलनी, शिरसोली नाका, जळगाव) यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली असून, त्यांचा आता नाशिक कारागृहात वर्षभर मुक्काम असणार आहे. तांबापुरा परिसरातील राहणार्या या बावरी कुटुंबियांतील सदस्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यासह इतर पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा >>>नाशिक : बनावट माहितीपत्रकाच्या आधारे घेतले कर्ज, आयडीएफसी फर्स्ट बँकेला ५४ लाखांचा चुना
यात दरोडा, जबरी लूट, हाणामारी, चोरी, दमदाटी, तीक्ष्ण हत्यार बाळगत दहशत माजविणे, असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना या बावरी टोळीविरुद्ध दाखल गुन्ह्यात मोक्का कायद्याचे कलम वाढविण्यासह प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
हेही वाचा >>>नाशिक: दाहिनीऐवजी सरणावरच अंत्यविधी,अंत्यसंस्कारात सव्वा कोटींचा खर्च
निरीक्षक हिरे यांनी तयार केलेला प्रस्ताव स्थानिक गुनहे शाखेमार्फत पोलीस अधीक्षकांकडे पाठविला. तो विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे मंजुरीसाठी पाठविल्यानंतर त्यास मंजुरी देण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नजनपाटील, अंमलदार युनूस शेख इब्राहिम, हवालदार सुनील दामोदरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, सहाय्यक निरीक्षक अतुल वंजारी, हवालदार सचिन मुंडे, योगेश बारी, सचिन पाटील यांनी ही कारवाई केली.