धुळे : विविध नामांकित कंपन्यांच्या तसेच डेअरीच्या पिशव्यांमधील दुधात भेसळ करुन तसेच बनावट कंपनीच्या नावाचा वापर करून अवैधरित्या भेसळयुक्त व रसायनयुक्त दुधाची विक्री रोखण्यासाठी यंत्रणांनी संयुक्त कारवाई करावी, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांनी केल्या आहेत. दूध भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बैठकीस अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर. एम. शिंदे, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ.अमित पाटील, उपनियंत्रक वैधमापन शास्त्र कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी केकाण यांनी जिल्ह्यात सण, उत्सवांच्या काळात दूध तसेच दुग्धजन्य मिठाई आदी खाद्य पदार्थांत मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्याचे निदर्शनास आणले.

हेही वाचा >>> “भाजपा सत्तेसाठी हपापलेली, राज्यात…”, राष्ट्रवादीच्या आमदाराचं टीकास्र

सण, उत्सवांच्या काळात दूध विक्रेत्यांच्या दुकानातून तसेच विविध नामांकित कंपनीच्या डेअरीच्या पिशवी बंद दुधातून, तसेच अनेक ठिकाणी बनावट ब्रँडच्या नावाचा वापर करून अवैधरित्या भेसळयुक्त व रसायनयुक्त कृत्रिम दुधाची विक्री होत असते. यामुळे दुधातील भेसळ रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकार्यांनी वेळोवेळी तपासणी करुन संयुक्त कारवाई करावी. तसेच कारवाई करताना गोपनीयतेचे पालन करावे, अशा सूचना केकाण यांनी केल्या.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action to prevent milk adulteration of dhule district administration ysh
Show comments