नाशिक – लूटमार, मारहाण आणि दहशत निर्माण करणाऱ्या देवळाली गावातील रोशन लवटे (२१) या गुंडाविरुध्द महाराष्ट्र विघातक कारवाई प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) स्थानबध्द करण्यात आले आहे. आतापर्यंत आठ जणांविरुध्द ही कारवाई करण्यात आली आहे.उपनगर पोलीस ठाणे हद्दीत रोशन लवटे याने देवळाली गाव, रोकडोबावाडी, विहितगांव, नाशिकरोड आणि नजीकच्या परिसरात दहशत निर्माण केली होती. सर्वसामान्यांना शस्त्रांचा धाक दाखवून लूटमार, मारहाण करुन लोकांच्या मनात दहशतीचे वातावरण निर्माण केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यास नाशिक शहर आणि ग्रामीण जिल्ह्यातून तीन महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले होते. रोशनने हद्दपार कालावधीनंतर पुन्हा गुन्हेगारी कारवाया सुरुच ठेवल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी त्यास मध्यवर्ती कारागृहात एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द करण्याचे आदेश दिले. रोशनविरूध्द उपनगर आणि नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. समाज स्वास्थ्य बिघडविणाऱ्यांवर एमपीडीए कायद्यातील तरतुदीनुसार प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु राहणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त शिंदे यांनी दिला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action under mpda against gangsters in devalali nashik amy
Show comments