लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाशिक: राज्यात काही ठिकाणी वेगवेगळ्या कारणांवरून जातीय तेढ, तणाव, दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात आले असतांना समाज माध्यमातून आक्षेपार्ह संदेश पाठवून तणाव वाढविला जात आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांविरुध्द शहर पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

राज्यात कोल्हापूर, सामनेर, धुळे या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांवरून दोन गटात वाद निर्माण झाले आहेत. सामाजिक तेढ वाढत असतांना काही ठिकाणी दंगलसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर नाशिक शहर पोलिसांनी शहरातील नागरिकांना फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटस अप, ट्विटर यासारख्या समाज माध्यमांतून कोणत्याही प्रकारच्या धार्मिक भावना दुखावणारे, अवमानकारक, सामाजिक तेढ निर्माण करणारे संदेश, छायाचित्र प्रसारित करू नये, असे केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दानिश मन्सुरी यांनी सामाजिक सलोखा धोक्यात येईल किंवा कोणाच्याही धार्मिक भावना दुखावतील असा मजकूर समाज माध्यमात टाकू नये, तसे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे बजावले आहे.