त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश केल्याबद्द्ल भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अगोदरही तृप्ती देसाई यांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी पोलिसांनी त्यांना रस्त्यातच रोखलं होतं.
महिलांना मंदिरात प्रेवश मिळावा, यासाठी तृप्ती देसाई यांनी लढा सुरू केला असून, त्यास परंपरावाद्यांकडून विरोध होत आहे. आज सकाळी महिलांसह देसाई यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश केला. यावेळी महिलांना मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी महादेवांकडे साकडे घातले आहे, असे देसाई यांनी सांगितले. देसाई यांनी मंदिरात प्रवेश केल्याचा स्थानिक महिला एकत्र येत या घटनेचा निषेध केला.
तृप्ती देसाईंच्या मोर्च्याला हिंदू जनजागृती समिती, सनातन तसेच नगरपरिषदेने विरोध केला होता. भूमाता ब्रिगेड प्रसिद्दी मिळवण्यासाठी हे करत असल्याचा आरोप मंदिर समितीचे संघटक सुनील घनवट यांनी केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा