मालेगाव – काँग्रेस नेते राहुल गांधी हे खरे गांधी नसून खान असून महात्मा गांधी यांच्या आडनावाचा गैरफायदा घेण्यात आला, असा आरोप अभिनेते शरद पोंक्षे यांनी येथे आयोजित व्याख्यानात केला. भारतीय विचार मंचच्या वतीने स्वातंत्र्यदिनी येथे पोंक्षे यांचे सावरकरांच्या जीवनावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मिरचीपूड फेकून लूट, धुळे तालुक्यातील घटना

नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी पोंक्षे यांनी राहुल गांधी यांच्या घराण्यावर चौफेर टीका केली. राहुल गांधी हे खरंच गांधी आहेत का, असा प्रश्न उपस्थित करीत त्यांचे आजोबा फिरोज गांधी यांचे मूळ आडनाव खान असल्याचा दावा पोंक्षे यांनी केला. राहुल गांधी हे सावरकरही नाहीत आणि गांधीही नाहीत. राहुल गांधी यांना आपल्या आजीचा इतिहास माहीत नाही तर सावरकरांचा कसा माहीत असणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. व्याख्यानासाठी श्रोत्यांची मोठी गर्दी उसळली होती.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor sharad ponkshe controversial remark on rahul gandhi in nashik zws