नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त या प्रमुख कुंडासह गंगासागर, गौतम तलाव, प्रयागतीर्थ, इंद्रकुंड यातील काही निवडक कुंडांचे मूळ सौंदर्य अबाधित राखून आगामी कुंभमेळ्यासाठी नुतनीकरणाचा मानस गुरुवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यात व्यक्त करण्यात आला. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यास अवघ्या दोन वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. सिंहस्थ कामांना वेग देण्यासाठी प्रशासकीय तयारी सुरु झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिकचे पालक सचिव एकनाथ डवले यांनीही प्रत्यक्ष पाहणी करून नियोजन करण्याचे सूचित केल्यानंतर गुरुवारी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रेया देवचक्के आदींनी त्र्यंबकेश्वरचा पाहणी दौरा केला.

त्र्यंबकेश्वरमध्ये साधारणत: ३० एकर क्षेत्रात साधुग्रामची उभारणी केली जाणार आहे. या जागेसह तळवाडे, पहिणे आणि अंबोली येथील वाहनतळाच्या जागेसह शाही मिरवणुकीचा मार्ग आदींची पाहणी करण्यात आली. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या जुन्या इमारतींचा उपयोग करता येईल, का यावर विचार झाला. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी होणाऱ्या गर्दीच्या काळात कसे नियोजन करता येईल, याविषयी प्रशासकीय पातळीवर चर्चा झाली.

अहिल्या-गोदा संगमावर दगडी पायऱ्या ?

मागील सिंहस्थात अहिल्या-गोदा संगम येथे घाटांची बांधणी करण्यात आली होती. हे घाट कॉक्रिटीकरणमुक्त करून दगडी पायऱ्यांच्या माध्यमातून पर्यायी स्नानाची व्यवस्था करता येईल काय, यावर विचार झाल्याचे या संयुक्त पाहणीदरम्यान झाल्याचे सांगण्यात येते. नाशिकप्रमाणेच त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ कुंभमेळ्याच्यादृष्टीने महत्व असल्याने या ठिकाणच्या तयारीकडेही यंत्रणेकडून लक्ष देण्यात येत आहे.