Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 Updates in Marathi : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर एकीकडे विजयोत्सव, तर दुसरीकडे पराभवामुळे नाराजी असे चित्र चित्र दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट एकमेकांना भिडले. या वादात तुफान दगडफेकही करण्यात आली. यात भाजपच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू, तर चाळीसच्या वर किरकोळ जखमी झाले आहेत. धनराज श्रीराम माळी (वय ३२) असे मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे.

हेही वाचा… जळगाव : खडसेंची सरशी; कुर्‍हा काकोडा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा

zilla parishad loksatta
राज्यातील सहा जिल्हा परिषद, ४४ पंचायत समितींवर ‘प्रशासक राज’; मुदतवाढ नाहीच
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Kumbh Mela 2025 : कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय?
स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय?
Ravindra Chavan talk on local body elections in exclusive interview with Loksatta
‘शक्तिशाली’ भारतासाठी ‘बलशाली’ भाजप आवश्यक
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?

ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांचा मतदारसंघ असलेल्या जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. तालुक्यातील टाकळी खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांनी गावात प्रवेश करीत जल्लोषात मिरवणूक काढली. मिरवणुकीवर विरोधी गटाच्या पॅनलकडून काही लोकांनी तुफान दगडफेक केली. पोलिसांनी संशयितांची धरपकड करून सुमारे पंधरा ते वीस जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गावात पोलिसांची मोठी कुमक तैनात करण्यात आली आहे.

हेही वाचा… जळगाव : गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांच्या कन्येचा विजय; मात्र पॅनलचा पराभव

टाकळी ग्रामपंचायतीच्या निकालानंतर दोन गट एकमेकांना भिडले. विजयी उमेदवारांच्या काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर विरोधी गटाच्या पॅनलकडून काही जणांनी दगडफेक केली. यामुळे गावात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. दगडफेकीत गंभीर जखमी झालेले भाजपचे कार्यकर्ते धनराज श्रीराम माळी (वय 32) यांना जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात जखमी झालेल्यांना दाखल करण्यात आले असून, तेथे कुटुंबियांसह नातेवाइकांची प्रचंड गर्दी झाली आहे.

Story img Loader