लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: मतदार यादीत नाव नोंदणीसाठी जिल्हा निवडणूक शाखेने प्रथमच ५३ महाविद्यालयांसमवेत करार केला असून महाविद्यालय व्यवस्थापन आणि निवडणूक यंत्रणा एकत्रितपणे हे काम करणार आहे. या माध्यमातून पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत नवमतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल. जिल्ह्यातील मतदारांमध्ये युवकांची संख्या कमी असल्याने हे प्रमाण वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात निवडणूक साक्षरता मंडळ स्थापना व कार्यपद्धतीबाबत कार्यशाळा पार पडली. जिल्हाधिकारी जलज शर्मा, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी जितिन रहेमान, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितिन ठाकरे, जिल्हा समन्वयक अविनाश शिरसाठ, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व विद्यार्थी उपस्थित होते. आगामी निवडणुकींच्या अनुषंगाने या प्रक्रियेत नवयुवकांना सहभागी करून घेतल्यास पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात निश्चितच सकारात्मक परिणाम दिसेल, असा विश्वास जिल्हाधिकारी शर्मा यांनी व्यक्त केला.
आणखी वाचा-नाशिक: विसर्ग आदेशाला न्यायालयात आव्हान, अपव्यय टाळण्यासाठी जायकवाडीतील मृतसाठा वापरण्याची मागणी
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने नवमतदार नोंदणी, मतदार यादीतील त्रूटी दूर करणे, मृत्यू झालेल्या मतदारांची नावे वगळणे यासाठी मोहीम राबविली जात आहे. नवमतदारांची संख्या अतिशय कमी असल्याने संबंधितांची नोंदणी वाढविणे गरजेचे आहे. यासाठी महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, शिकवणी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचे सहकार्य अपेक्षित आहे. महाविद्यालयीन स्तरावर नवयुवकांची मतदार नोंदणी वाढविण्याच्या दृष्टीनेच या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यात महाविद्यालये ,शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य व शिकवणीचे संचालक यांनाही सहभागी करण्यात येणार असल्याचे शर्मा यांनी नमूद केले.
वर्शिप अर्थ फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस गुजराथी यांनी ५३ महविद्यालयांशी सामंजस्य करार झाल्याचे सांगितले. मतदान जनजागृती व नवयुवक नोंदणीसाठी उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या महाविद्यालयांना ५० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. या कार्यशाळेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सहा महिन्यांची अभ्यासवृत्ती (इंटर्नशीप) दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा-नाशिक: कांदा कोंडी फुटली; व्यापाऱ्यांचा संप मागे
नवमतदारांची सद्यस्थिती
जिल्ह्यात एकूण मतदारसंख्या ४६ लाख ५० हजार ६४० असून यात १८ ते १९ वयोगटातील म्हणजे नवमतदारांची संख्या केवळ ४४ हजार ३४१ (०.८५ टक्के) आहे. १८ वर्षापुढील प्रत्येक विद्यार्थ्याने मतदार नोंदणी करावी, या दृष्टीने निवडणूक शाखेचा प्रयत्न आहे. नव मतदारांची १०० टक्के मतदार नोंदणी करण्यासाठी महाविद्यालये, शिक्षण संस्था, विद्यापीठांची मदत घेतली जाणार आहे. जिल्ह्यात १९ ते १९ वयोगटातील नवयुवकांची संख्या अंदाजे दोन लाख १९ हजार इतकी आहे. नोंदणी झालेले मतदार वगळता या मोहिमेतून सुमारे पावणेदोन लाख नवमतदार नोंदणीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या सोबत महाविद्यालयांमधून अन्य वयोगटातील युवकांची नोंदणी केली जाईल.
निवडणूक प्रक्रियेची अनुभूती
पात्र विद्यार्थी मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी लोकशाहीच्या या प्रकियेत विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जात आहे. यासाठी विद्यार्थ्यांचा सहभागही महत्वाचा आहे. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया जवळून अनुभवयास मिळणार आहे. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची सेवा निवडणूक मतदान आणि मतमोजणी कामासाठी उपयोगात आणली जाईल. यात महाविद्यालयाच्या प्राचार्यांची जबाबदारी मोठी आहे. महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांची नोंदणी त्यांनी करून घ्यावयाची आहे. येणाऱ्या सहा महिन्यांत हे काम सर्वांनी मिळून पार पाडले जाणार असून सर्वांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे यांनी केले.