लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नाशिक : आयपीएल कंपनीचे तणनाशक फवारल्याने देवळा, कळवणसह अन्य तालुक्यांत कांदा पिकाच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, संबंधित औषधाचे नमुने केंद्र व राज्य सरकारच्या प्रयोगशाळांसह अन्य ठिकाणी तपासणीसाठी पाठविले जाणार आहे. कोणते नमुने, कोणत्या प्रयोगशाळेत गेले, यात गोपनीयता राखण्यासाठी सांकेतांकाद्वारे दक्षता घेतली जाईल. प्रथमदर्शनी या नुकसानीला संबंधित कंपनी जबाबदार असल्याचा ठपका राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिक कोकाटे यांनी ठेवला. दरम्यान, या तणनाशकामुळे जिल्ह्यात ३०० ते ४०० एकर क्षेत्रावरील कांद्याचे नुकसान झाल्याची तक्रार महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेने केली.
विशिष्ट कंपनीने तणनाशक फवारल्याने कांदा पिकांचे पूर्णतः नुकसान झाल्याचे प्रकार समोर येत आहे. या अनुषंगाने सोमवारी कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी कृषिमंत्री कोकाटे यांची भेट घेतली. देवळा तालुक्यात १०० एकरहून अधिक कांद्याचे नुकसान झाले. कळवणमध्ये २० ते २५ एकर क्षेत्रात हे प्रकार घडले असून इतरत्र असे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांना सर्वत्र पडताळणी व पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे कृषिमंत्री कोकाटे यांनी सांगितले. दुकानांमधील संबंधित कंपनीचे तणनाशकाचा साठा गोठवून विक्रीलाही प्रतिबंध घालण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
तणनाशक उत्पादक कंपनीला जाब विचारण्यात आला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार हे औषध गव्हासाठी वापरले जाते. यातील काही घटक व कांद्यासाठी वापरले जाणारे तणनाशक यांच्यात काहीसे साम्य आहे. अनेक वर्षांपासून ते वापरले जाते. तणनाशकाच्या एखाद्या तुकडीत काही दोष असू शकतो. नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात शासनाची भूमिका नाही. कंपनीने ती द्यावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. हे औषध दुकानदारांनी शेतकऱ्यांना सुचविल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. प्रयोगशाळेतील तपासणीतून औषधातील चुकीचे घटक समोर येतील. त्याच्या विक्रीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा दोष नसल्याचा दावा त्यांनी केला.
शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार
देवळा, कळवण, मालेगाव, सिन्नर आदी तालुक्यांतील सुमारे ४०० एकर क्षेत्रावरील रब्बी हंगामातील कांद्याचे नुकसान झाल्याकडे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी लक्ष वेधले. आयपीएल कंपनीचे तणनाशक फवारल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. कृषी विभागाने जनजागृती केली नाही. शेतकऱ्यांची एकप्रकारे फसवणूक झाली. सरकारने नुकसानग्रस्तांना प्रति एकर दीड लाख रुपये तातडीची मदत जाहीर करण्याची मागणी संघटनेने केली. देवळा तालुका शेतकरी संघाने रासायनिक खतांच्या बरोबर येणारे लिंकिंग खते बंद करण्याची मागणी केलेली आहे.