नाशिक : शिवसेनेतील (ठाकरे गट) एकाच वेळी १२ माजी नगरसेवक आणि नंतर अनेक पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात आणण्यात महत्वाची भूमिका निभावणारे मनपातील माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या जिल्हा प्रमुखपदी तर राजू लवटे यांची जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही नियुक्ती केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिवसेनेत फूट पडल्यानंतर नाशिकमधून तीन, चार महिने शिंदे गटाला अपेक्षित रसद मिळाली नव्हती. दोन आमदार आणि एक खासदार शिंदे गटात सहभागी झाले. मात्र, संघटनात्मक पातळीवर फारशी फाटाफूट झाली नाही. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ही स्थिती राज्यातील सत्ताधारी शिंदे गटाला अस्वस्थ करणारी होती. या स्थितीत मनपातील माजी विरोधी पक्षनेते बोरस्ते आणि शिवसेनेशी कायमच एकनिष्ठ राहिलेले माजी नगरसेवक लवटे यांच्या नेतृत्वाखाली १२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश करीत ठाकरे गटाला धक्का दिला होता. त्यानंतर ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटाकडे ओघ सुरु झाला. माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना शिंदे गटाकडे खेचणाऱ्यांना महत्वाची पदे देऊन शिंदे गटाने त्यांना ताकद दिली आहे.

हेही वाचा >>> धक्कादायक! ६० वर्षीय दिव्यांग महिलेवर २२ वर्षीय तरुणाकडून बलात्कार

बुधवारी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नाशिक जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी राजू लवटे आणि जिल्हाप्रमुखपदी अजय बोरस्ते यांची निवड करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दादा भुसे, सचिव भाऊसाहेब चौधरी आदी उपस्थित होते. लवटे हे बालपणापासून शिवसेनेशी जोडलेले आहेत. २०१४ मध्ये नाशिक पूर्वमधून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. ज्येष्ठ नेत्याकडे सहसंपर्क प्रमुखपदाची जबाबदारी सोपविल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे.

हेही वाचा >>> नाशिक : समस्यांमुळे राजापूर आरोग्य केंद्रच आजारी; सुधारणा न झाल्यास आशिमा मित्तल यांचा कारवाईचा इशारा

शिवसेना महानगर प्रमुख, मनपा गटनेते, मनपा विरोधी पक्षनेते आदी पदांची जबाबदारी पार पडलेल्या अजय बोरस्ते यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेची संपूर्ण जबाबदारी बोरस्ते यांनी सांभाळली होती. त्यामुळे शिंदे यांनी नाशिक जिल्ह्याची जबाबदारी बोरस्ते यांच्याकडे सोपवली. शहरी नेतृत्व अशी ओळख असलेल्या बोरस्ते यांना आता ग्रामीण भागाशीही संपर्क ठेवावा लागणार आहे. येत्या काळात बाळासाहेबांची शिवसेनेचा भगवा संपूर्ण नाशिक शहर व जिल्ह्यात पोहचवू आणि नाशिकच्या विकासासाठी काम उभे केले जाईल, आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युतीचे राज्य येईल, असा विश्वास बोरस्ते यांनी व्यक्त केला.