नाशिक – नाशिकमध्ये संगीत महाविद्यालयासाठी भूखंड खरेदी व्यवहारात फसवणूक झाल्याचा विषय गायक सुरेश वाडकर यांनी मांडला असून या संदर्भातील अडथळे दूर करण्यासंदर्भात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
येथील महाकवी कालिदास कलामंदिरात सुविचार मंचतर्फे आयोजित पुरस्कार सोहळ्यात गायक सुरेश वाडकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी वाडकर यांनी, नाशिकमध्ये संगीत महाविद्यालयासाठी जागा खरेदी व्यवहारात कशी फसवणूक झाली, ते मांडले.
“वाडकरांचे स्वप्न आम्ही पूर्ण करू”
या व्यवहारात आता बरेचसे काम होत आले असून उर्वरित काम कुठे अडकले ते माहीत नसल्याचे सांगत पवार यांनी हा प्रश्न मार्गी लावावा, असे गाऱ्हाणे मांडले. त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी वाडकर यांचे मुंबईप्रमाणेच नाशिकमध्ये संगीत महाविद्यालय सुरू करण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करू, असे आश्वासन दिले.
हेही वाचा : “दादा मला वाचवा”, सुरेश वाडकरांची भर सभेत अजित पवारांना विनंती; म्हणाले, “काका मला…”
यावेळी व्यासपीठावर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार तसेच मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.