नाशिक : येथील तपोवन मैदानात शुक्रवारी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत लाडकी बहीण मेळाव्यास मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित राहणार होते. परंतु, अजित पवार यांना नाशिक येथे येण्यास उशीर झाल्याने ते कार्यक्रमास उपस्थित न राहताच माघारी परतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत होणाऱ्या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार होते. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून शहर तसेच जिल्ह्यात तशी फलकबाजी करण्यात आली होती. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमास सुरुवात झाली तरी अजित पवार हे शहरात आलेले नव्हते.

हेही वाचा…Nepal Bus Accident : जळगाव जिल्ह्यातील २४ मृतांची ओळख पटली

दुपारी ओझर विमानतळावर त्यांचे आगमन झाले असता आ. दिलीप बनकर, खासदार सुनील तटकरे यांनी त्यांचे स्वागत केले. इकडे कार्यक्रमस्थळी दादा भुसे, छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु झाल्याने पवार हे कार्यक्रमस्थळी न येता माघारी फिरले. ते हवाईमार्गे मुंबईकडे मार्गस्थ झाले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar misses women s empowerment event in nashik returns to mumbai without attending psg