नाशिक – निवडणुकीत आमच्या विचारांची माणसे निवडून द्या, योजना बंद होणार नाहीत. दरवर्षी आदिवासी बांधव मोर्चे काढून मुंबईत येतात. त्यांच्या मागण्यांविषयी लक्ष घातले आहे, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आपल्या भागातील काम करण्याची धमक आणि ताकद आमच्यात आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले.

कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी ७३६ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पवार यांनी मार्गदर्शन केले. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार नितीन पवार आदी उपस्थित होते.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
ajit pawar meet sharad pawar
अजितदादा सहकुटुंब पवारांच्या भेटीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची गर्दी
Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

हेही वाचा – नाशिक : अंबड पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकासह मनपा कर्मचाऱ्यांना मारहाण

कधी कोणाला शब्द देत नाही आणि दिला तर तो फिरवत नाही. हा अजितदादाचा वादा आहे. सप्तश्रृंग गड या धार्मिक स्थळाच्या विकासासाठी ८२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, ही भावना आहे. तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे असल्याने २२०० कोटींचा निधी कळवण आणि सुरगाणा या दोन तालुक्यांना दिला आहे. नितीन पवार आणि इतर आमदार बरोबर असल्याने निधी देऊ शकलो. महिलांना मानसन्मान मिळाला पाहिजे. आर्थिक बाबतीत महिला सक्षम झाल्या पाहिजेत. अडीच लाखपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना मदत देण्याची भूमिका मांडली. मोलमजुरी, धुणीभांडी करणाऱ्या महिलांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा – इगतपुरी आदिवासी वसतिगृहातील समस्या सोडविणार, डॉ. नयना गुंडे यांचे आंदोलकांना आश्वासन

कामांची जंत्री

अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह अन्य शासकीय योजनांची माहिती दिली. आमदार झिरवळ यांनी सद्यस्थितीतील राजकारण मांडत विरोधकांवर टीका केली. मतदारसंघातील पाणीप्रश्न, वनपट्टे, बंधारे आदी प्रश्नांकडे त्यांनी लक्ष वेधले. नितीन पवार यांनी मतदारसंघातील विकास कामांची माहिती दिली. सुरगाणा तालुक्याला शासन दरबारी असलेला आकांक्षित जिल्हा ही ओळख पुसण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

Story img Loader