नाशिक : सत्ताधारी महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट समोरासमोर आल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचा प्रचार शिगेला पोहचला आहे. एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. महाविकास आघाडीही रिंगणात असल्याने निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. मतदारांना आपलेसे करण्यासाठी उमेदवारांकडून वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखविण्यात येत आहेत.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. नाशिकसह अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांचा समावेश असलेला हा विशाल मतदारसंघ असल्याने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांना कसरत करावी लागत आहे. मतदारसंघात २१ उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत शिवसेना शिंदे गटाचे विद्यामान आमदार किशोर दराडे, महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संदीप गुळवे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, शिक्षक लोकशाही आघाडीचे प्रा. भाऊसाहेब कचरे, भाजपशी संबंधित अपक्ष विवेक कोल्हे यांच्यात आहे. शिक्षक मतदारसंघ असला तरी अपवाद वगळता प्रमुख उमेदवार मात्र शिक्षक नव्हे तर, शिक्षण संस्थाचालक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मविआकडून संजय राऊत हे प्रचाराच्या मैदानात उतरल्याने शिंदे गट आणि ठाकरे गट यांनी ही निवडणूक किती गांभीर्याने घेतली ते लक्षात येऊ शकेल.

Badlapur candidature, fight in BJP, Badlapur,
बदलापुरात उमेदवारीवरून भाजपातच राडा, निरीक्षकांसमोरच यादीवरून कथोरे – पाटील गटात वाद
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Dada Bhuse And Malegaon Politics
Malegaon Outer : मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघावर दादा भुसेंचं वर्चस्व नेमकं कसं आहे? जाणून घ्या
Pratap Sarnaik in Ovala Majiwada Vidhan Sabha Constituency Assembly Election 2024
Ovala Majiwada Sabha Constituency : उच्चभ्रू वस्तीच्या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार?
Pune, Thackeray group, Mahavikas Aghadi,
पुण्यात ठाकरे गटामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी
mla manda mhatre seek ticket for belapur assembly constituency from cm eknath shinde dcm fadnavis
बेलापूरात शिंदे-फडवणीसांना ‘बहिणी’ची साद; मंदा म्हात्रे ‘लाडक्या’ ठरतील का याचीच चर्चा अधिक
eknath shinde shiv sena to get less seat in marathwada for maharashtra polls
मराठवाड्यात शिंदे गटाला जागांचा तोटा? अनेक मतदारसंघांवर दावा सोडण्याची शक्यता
murbad mahayuti dispute marathi news
मुरबाडमध्ये महायुतीतच एकमेकांवर कुरघोडी, भाजप शिवसेनेकडून एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांची फोडाफोडी

हेही वाचा >>> संजय राऊत यांचं मोठं विधान, “नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात आपलाच मुख्यमंत्री”

राज्यातील सत्तेत एकत्र असतानाही शिक्षक मतदारसंघात मात्र शिंदे गट आणि अजित पवार गट एकमेकांविरुद्ध ठाकले आहेत. मतदानाला अवघे तीन दिवस बाकी असतानाही शिंदे गटाकडून अजित पवार गटाने उमेदवार मागे घ्यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आपण शांत राहावे, यासाठी आपल्या मुलाला शिंदे गटाकडून भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्यात आला होता, असे अजित पवार गटाचे उमेदवार महेंद्र भावसार यांचे म्हणणे आहे. आपल्या पक्षाकडून कोणताही आदेश नसल्याने आपण उमेदवार म्हणून प्रचार करणारच आहोत, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी नाशिक, अहमदनगर, जळगाव येथे शिक्षण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या.

जागा राखण्याचे शिंदे गटापुढे आव्हान; ‘शिक्षक मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका’

राज्याला शिक्षकांची मोठी परंपरा आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री जर शिक्षण, शिक्षकांचे शेअर बाजाराप्रमाणे भाव लावत असतील तर ही परंपरा खंडित होईल, अशी भीती वाटते. शिक्षक त्यांचा प्रतिनिधी निवडतील. त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघातील महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांच्या प्रचारार्थ राऊत नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधला. मतदारसंघात काही उमेदवारांकडून शिक्षकांना विविध प्रलोभने दाखविण्यात येत असल्याविषयी चिंता व्यक्त केली.