लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: महाविकास आघाडीच्या काळात राज्याचे अर्थखाते अजित पवार यांच्याकडे होते. त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांना निधीच दिला नाही. त्यामुळेच शिवसेनेत खरा उठाव झाला. शिवसेनेतील उठावाला जितके उध्दव ठाकरे जबाबदार, तितकेच अजित पवार हे देखील जबाबदार असल्याचा आरोप ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केला. शिवसेनेला (ठाकरे गट) त्यांचेच आमदार, खासदार पक्ष सोडून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. पुढील काळात ठाकरेंना आणखी झटके बसणार असून त्यांच्याकडे केवळ सकाळचा भोंगा शिल्लक राहील, अशी खिल्ली त्यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता उडवली.

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात

भाजपच्या जनसंपर्क अभियानांतर्गत रविवारी येथे गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात व्यापारी संवाद संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मोदी सरकारने नऊ वर्षात व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांसह विविध घटकांसाठी घेतलेले निर्णय, राबविलेल्या योजनांची माहिती महाजन यांनी संमेलनात दिली. नंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे गट आणि राष्ट्रवादीवर टिकास्त्र सोडले. जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून पालकमंत्री आणि राष्ट्रवादी यांच्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. निधीचे फेर नियोजन करताना उपलब्ध निधीच्या दहापट कामे मंजुर झाल्यामुळे आमदारांना नवीन कामांसाठी निधी मिळणार नाही. चुकीच्या पध्दतीने केलेल्या पुनर्विलोकनाची चौकशी करावी अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा माजीमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. या संदर्भात राष्ट्रवादीच्या आमदारांनी नियोजन विभागाकडे तक्रार केली आहे. निधी वाटपावरून उपस्थित झालेल्या प्रश्नावर महाजन यांनी विरोधी पक्षांनी महाविकास आघाडीच्या कार्यकाळात काय झाले, याचा विचार करावा असा सल्ला दिला. अजित पवार यांनी नियोजन हे कागदोपत्री दाखवू का, असे आव्हान दिले. त्यामुळे बेबनाव होऊन उठाव झाला. राज्यात सत्तांतरानंतर शिंदे गटाच्या आमदारांना अधिक निधी दिला जात असल्याबाबत कुठलीही तक्रार आलेली नाही. आता नियमानुसार आणि निकषानुसार निधी दिला जातो, असा दावा त्यांनी केला.

आणखी वाचा-नाशिक : जिल्हा नियोजन निधी वाटपावरून पालकमंत्री-विरोधकांमध्ये नवे वाद

महाजन यांनी मनिषा कायंदे यांच्यानंतर आणखी काही झटके उध्दव ठाकरे यांना बसणार असल्याकडे लक्ष वेधले. औरंगजेबाच्या कबरीला प्रकाश आंबेडकर यांनी भेट देण्यामागे केवळ मतांचे लांगूलचालन आहे. आंबेडकर यांच्या पक्षाशी युती करणाऱ्या ठाकरेंनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचार विनिमय सुरू असून कुणाला स्थान द्यायचे, कुणाला काढायचे हे निश्चित करण्याचा दोन्ही पक्षांना अधिकार आहे. राज्यात कुठेही बनावट बियाणांचा प्रकार उघड झालेला नाही. तसे झाल्यास शेतकरी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी तक्रारी नोंदविल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे महाजन यांनी सांगितले.

लवकरच नवीन जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त

आयुक्तांची बदली होऊन तीन आठवडे उलटत असताना अद्याप पूर्णवेळ आयुक्तांनी नेमणूक न झाल्यामुळे महानगरपालिकेची अनेक महत्वाची कामे ठप्प झाली आहेत. या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर महाजन यांनी दोन ते तीन दिवसात नाशिक महापालिकेला नवीन आयुक्त मिळणार असल्याचे सांगितले. तसेच नाशिकला नवीन जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्तीही होणार असल्याचे ते म्हणाले.

Story img Loader