नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेतंर्गत पंचवटी येथील श्री काळाराम मंदिरात दर्शन घेतले. आरती तसेच संकल्प पूजन करण्यात आले. पंचवटी येथील श्री काळाराम मंदिरात यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनेचे उध्दव ठाकरे, मनसेचे राज ठाकरे, राज्यपाल रमेश बैस आदी वरिष्ठ नेत्यांनी दर्शन घेत पूजन केले आहे. जनसन्मान यात्रेनिमित्त गुरूवारी जिल्ह्यात आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सायंकाळी काळाराम मंदिरात दर्शन घेतले.

खासदार सुनील तटकरे, आ. छगन भुजबळ, आ. धनंजय मुंडे, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आदी उपस्थित होते. यावेळी पवार यांच्या स्वागतासाठी भाजपचे आमदार राहुल ढिकले यांनी फलकबाजी केली होती. पवार यांच्या दर्शनकाळात इतर भाविकांसाठी दर्शन व्यवस्था बंद ठेवण्यात आल्याने अन्य भाविकांची गैरसोय झाली. यावेळी महंत सुधीरदास महाराज यांनी पवार यांच्या हस्ते संकल्प पूजन केले. श्रावणातील एकादशीपासून पुढील श्रावणापर्यंत एकादशीला रामरायाला अभिषेक करण्यात येणार आहे.

Ajit Pawar, Ajit Pawar Ganapati Darshan Pune,
पुण्यात अजित पवारांसमोरच वाजली तुतारी…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
sanjay raut reaction on amit shah mumbai statement
“बॉम्बेचं मुंबई करण्यात तुमचं योगदान असेल, तर…”; ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल!
Ganesha Solapur, mandals welcomed ganesha,
सोलापुरात श्री गणरायाचे जल्लोषात स्वागत, शहरात १३५० मंडळांनी केली श्रींची प्रतिष्ठापना
vasai lawyer association protest
वसई: वकील संघटनांचे आंदोलन स्थगित; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे आश्वासन
Somnath Gaikwad arrested in Vanraj Andekar murder case Pune news
वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड गजाआड; आंदेकर यांची बहीण आणि भाचाही अटकेत
High Court, Ganesh idol POP, Ganesh idol,
पीओपीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना नको, बंदीचे काटेकोर पालन करण्याबाबत मंडळांना माहिती द्या, उच्च न्यायालयाचे आदेश
Radhekrishna Group, Dahi Handi,
पुणे : सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुप ने सात थर लावून फोडली

हेही वाचा…नाशिक : राका कॉलनीतील घरफोडी प्रकरणी तीन संशयित ताब्यात

संकल्प पूजनानंतर देवस्थानच्या वतीने पवार यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर त्यांनी भजनी मंडळातील महिलांशी संवाद साधला. साधुग्राम प्रश्नाविषयी शेतकऱ्यांनी पवार यांची भेट घेत समस्यांचा पाढा वाचला. याबाबत तातडीने बैठक बोलवून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन पवार यांनी दिले. वेगवेगळ्या संघटनांच्या वतीने पवार यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा…अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचा शुभारंभ शरद पवार गटाच्या नेत्याच्या कौतुकाने

आमचं वय बाद

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काळाराम मंदिर परिसरात असलेल्या भजनी मंडळातील महिलांशी संवाद साधला. महिलांना लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला का, असा प्रश्न विचारला असता उपस्थित महिलांनी आमचं वय बाद झाले आहे, असे उत्तर दिले.