नाशिक, मालेगावातील १६७६ मतदान केंद्रांवरील घडामोडींचे थेट प्रक्षेपण

नाशिक आणि मालेगाव महापालिका हद्दीतील सर्व १६७६ मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करून घडामोडींचे थेट प्रक्षेपण (वेबकास्ट) करण्यात येणार आहे.

all 1676 polling stations in Nashik and Malegaon have CCTV and live webcast
ग्रामीण भागातील निम्म्या मतदारसंघात सीसी टीव्ही यंत्रणा असणार आहे. (image pixabay/representational image)

नाशिक : नाशिक आणि मालेगाव महापालिका हद्दीतील सर्व १६७६ मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करून घडामोडींचे थेट प्रक्षेपण (वेबकास्ट) करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सहा संवेदनशील तसेच पोलीस आणि प्रत्येक विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी जी केंद्रे संवेदनशील म्हणून निश्चित करतील, तिथेही व्यवस्था केली जाणार आहे. ग्रामीण भागातील निम्म्या मतदारसंघात सीसी टीव्ही यंत्रणा असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१५ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला जिल्ह्यातील ४९२६ केंद्रांवर मतदान होणार आहे. निवडणूक यंत्रणेने तयारीला वेग दिला आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, शौचालय, वाहनतळ, खुर्ची आदींची व्यवस्था करण्याची सूचना जिल्हा परिषद व महापालिकेला करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून मतदान केंद्रांवर लक्ष ठेवले जाणार आहे. नाशिक शहरात ११७९ मतदान केंद्रे असून मालेगाव शहरात ही संख्या ४९७ इतकी आहे. शहरी भागातील सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविली जाईल. येथील घडामोडींचे थेट प्रक्षेपण होणार असल्याने प्रत्येक मतदारसंघातील मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून नजर ठेवली जाईल. ग्रामीण भागातील ५० टक्के मतदान केंद्रात ही व्यवस्था कार्यान्वित केली जाईल, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांंनी नमूद केले. ग्रामीण भागात १६२६ केंद्रांवर सीसी टीव्ही बसवून थेट.

हेही वाचा…मतदारांना प्रलोभन देणाऱ्या विरोधात मालेगावात कारवाई

u

प्रक्षेपणाचे नियोजन करण्यात येणार आहे.

मतदारसंघनिहाय केंद्र नांदगाव (१७२), मालेगाव मध्य (३४४), मालेगाव बाह्य (२५३), बागलाण (१४४), कळवण (१७४), चांदवड (१५३), येवला (१६४), सिन्नर (१६९), निफाड (१३९), दिंडोरी (१८७), नाशिक पूर्व (३३१), नाशिक मध्य (३०३), नाशिक पश्चिम (४१३), देवळाली (२०६), इगतपुरी (१५०) या केंदांवरील घडामोडींचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: All 1676 polling stations in nashik and malegaon have cctv and live webcast sud 02

First published on: 11-11-2024 at 15:17 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा