नाशिक – मतदार नोंदणी, मयत मतदार वगळणी, मतदार स्थलांतरण, मतदार तपशीलातील बदल अशा मतदार यादीशी संबंधित कामांत राजकीय पक्षांचा अधिकाधिक सहभाग घेतला जाणार असून त्या दृष्टीने राजकीय पक्षांनी नेमलेल्या केंद्रस्तरीय प्रतिनिधीला कितीही अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. याआधी संबंधित प्रतिनिधीला केवळ ३० अर्ज सादर करण्याची मर्यादा होती. शपथपत्रासह आता तो कितीही अर्ज सादर करू शकतो.

जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघातील ४७३९ मतदार यादी भागांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाने हाती घेतला आहे. प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करीत त्याची सुरुवात झाली. राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीत याविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर प्रत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मतदार यादीशी संबंधित कामांत राजकीय पक्षांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रथमच नवीन पाऊल उचलण्यात आल्याचे नमूद केले. राजकीय पक्षांचा केंद्रस्तरीय प्रतिनिधी आता शक्य तेवढे अर्ज सादर करू शकतो. केवळ त्याला विहित नमुन्यातील शपथपत्र सादर करावे लागणार आहे.

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
markadwadi villagers marathi news
मारकडवाडी ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक, रामदास आठवले यांची भूमिका
MLA Jitendra Awhad allegations regarding assembly election voting machines thane news
मतदान यंत्रे हॅक केली नाही तर, त्यात छेडछाड केलीय; आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
professor recruitment halted in maharashtra s non agricultural universities
अन्वयार्थ : निम्मेशिम्मे प्राध्यापक!
Professor recruitment, Professor recruitment delayed,
….तर प्राध्यापक भरती आणखी सहा महिने लांबणीवर?
Maharashtra Chief Electoral Officer S. Chockalingam
एक लाख मतदान केंद्रांवर वाढीव मतदान; मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचे प्रतिपादन

हेही वाचा – नाशिक जिल्ह्यातील ५५० गावांत राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी, मराठा आरक्षणप्रश्नी रविवारपासून गाव पातळीवर जनजागृती

मतदारांमध्ये १८ ते १९ वयोगटातील म्हणजे युवकांची संख्या अतिशय कमी म्हणजे ४४ हजार ३४१ (०.८५ टक्के) असून ही चिंतेची बाब आहे. युवक मतदारांची संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाकडून आरोग्य विज्ञान व मुक्त विद्यापीठ तसेच शहर व ग्रामीण भागातील महाविद्यालयांशी संपर्क साधला जाणार आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन केले जाणार आहे. विद्यापीठातील विद्यार्थी संपूर्ण राज्यातील असले तरी त्यांनी आपापल्या भागात मतदार नोंदणी करावी असा आग्रह धरला जाणार आहे. १८ वर्षांपुढील प्रत्येक विद्यार्थ्याने मतदार नोंदणी करावी या दृष्टीने विशेष मोहीम राबविण्याची तयारी यंत्रणेने केली आहे. नव मतदारांची १०० टक्के मतदार नोंदणी करण्यासाठी महाविद्यालयांची मदत घेतली जाणार आहे.

हेही वाचा – नाशिक जिल्ह्यातील बंद कारखान्यांची आता पडताळणी, अमली पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी महामार्गांवर वाहनांची तपासणी

जिल्ह्यातील एकूण मतदार – ४६ लाख ५० हजार ६४०

पुरुष मतदार – २४ लाख २९ हजार ८०१ (५२.२५ टक्के)

स्त्री मतदार – २२ लाख २० हजार ७५८ (४७.७५ टक्के)

हजार पुरुषांमागे स्त्री मतदारांचे प्रमाण – ९१४

अपंग मतदारांची संख्या – १९ हजार ४६१ (०.४२ टक्के)

Story img Loader